Elec-widget

राष्ट्रवाद ही आमची प्रेरणा - नरेंद्र मोदी

राष्ट्रवाद ही आमची प्रेरणा - नरेंद्र मोदी

नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवाद ही आमची प्रेरणा असल्याची घोषणा केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 08 एप्रिल : लोकसभा निवडणुकीकरता भाजपनं संकल्पपत्र जाहीर केलं. यावेळी नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज, अरूण जेटली, राजनाथ सिंह यांनी भाषणं केली. आपल्या भाषणादरम्यान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवाद ही आमची प्रेरणा असल्याची घोषणा केली. यावेळी बोलताना नरेंद्र मोदी यांनी महापुरूषांच्या स्वप्नातील भारत साकारू असं आवाहन जनतेला केलं. भाजपनं जाहीरनाम्यात राम मंदिराचा पुनरूच्चार देखील केला आहे. शेतकऱ्यांना 60 वर्षानंतर पेन्शन देणार अशी घोषणा भाजपनं केली आहे. शिवाय, देशाच्या सुरक्षेशी तडजोड करणार नाही असं देखील भाजपनं स्पष्ट केलं आहे. दहशतवादी कारवाया रोखण्यासाठी कठोर पावलं उचलू असं भाजपनं आपल्या संकल्प पत्रात म्हटलं आहे.


शेतकरी, व्यापाऱ्यांना पेन्शन

तर, 1 लाखापर्यंतच्या कृषीकर्जावर 5 वर्षापर्यंत कोणतंही व्याज आकारलं जाणार नाही असं भाजपनं म्हटलं आहे. छोट्या शेतकऱ्यांना दरवर्षी 6 हजार रूपये किसान सन्मान निधी देण्याची घोषणा भाजपनं केली आहे. आपल्या जाहीरनाम्यात भाजपनं सर्व रेल्वे मार्गांचं विद्युतीकरण 2022 पर्यंत पूर्ण करणार आणि 2022 पर्यंत 75 संकल्प पूर्ण करण्याचं भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. सर्व घरांमध्ये वीज, शौचालय देण्याचं आश्वासन देखील भाजपनं दिलं आहे. तसेच नव्या मेडिकल कॉलेजची स्थापना करण्याचं आश्वासन, छोट्या दुकानदरांना देखील 60 वर्षानंतर पेन्शन दिली जाईल असं भाजपनं आपल्या संकल्पपत्रात म्हटलं आहे. शिवाय, राष्ट्रीय व्यापार आयोगाची स्थापना करण्याचं आश्वासन देखील भाजपनं दिलं आहे. मुस्लिम महिलांच्या मुद्यावर तीन तलाकविरोधात कायदा आणून मुस्लिम महिलांना न्याय देणार असल्याचं भाजपनं आपल्या संकल्पपत्रात म्हटलं आहे.


Loading...

VIDEO : शिवसेना खासदारांनी जात काढल्यावर अमोल कोल्हेंचा जाहीर सभेतून पलटवार

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 8, 2019 12:57 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...