VIDEO : 'काशीचा ट्रेलर 'हिट', 23 मेचा पिक्चर 'सुपरहिट'

VIDEO : 'काशीचा ट्रेलर 'हिट', 23 मेचा पिक्चर 'सुपरहिट'

काँग्रेसचे उमेदवार अजय राय हेच मोदींचा पराभव करतील. त्यांना प्रियंका गांधींची गरज नाही.

  • Share this:

नवी दिल्ली 26 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा वाराणसीतला रोड शो हिट झाला आणि 23 मेचा पिक्चरही सुपरहिट होईल असा टोला भाजपने काँग्रेसला लगावला आहे. मोदींच्या गुरुवारच्या रोड शोला मध्ये प्रचंड गर्दी झाली होती. त्याचा परिणाम पूर्वांचलातल्या जागांवर होईल अशीही शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र भाजपची ही गर्दी भाड्याची होती हे लवकरच कळेल असा टोला काँग्रेसने लगावलाय.

न्यूज18 इंडियाच्या आर पार कार्यक्रमात काँग्रेस आणि भाजपच्या प्रवक्त्यांचा जोरदार वाद प्रतिवाद झाला. वाराणसीत भाजपचं शक्तिप्रदर्शन होत असताना काँग्रेसने प्रियंका गांधी लढणार नाहीत हे सांगून काय मिळवलं असा प्रश्न काँग्रेसचे प्रवक्ते अखिलेश प्रताप सिंग यांना केला असताना ते म्हणाले, काँग्रेसचे उमेदवार अजय राय हेच मोदींचा पराभव करतील. त्यांना प्रियंका गांधींची गरज नाही.

मोदींनी वाराणसीला दिलेली आश्वासनं पूर्ण केली नाहीत गंगा अस्वच्छच आहे असा दावा सिंग यांनी केला. तर त्यांना प्रत्युत्तर देताना भाजपचे प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी म्हणाले. प्रियंका गांधी यांनी आपली पहिली निवडणूक यात्रा ही गंगेतूनच काढली होती. गंगा अस्वच्छ असती तर त्यांनी भाजपला सोडलं नसतं. गंगा स्वच्छ आहे हे काँग्रेसचं मौनच सांगून जाते असंही ते म्हणाले.

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लढू शकतात अशी शक्यता काँग्रेसकडूनच व्यक्त केली जात होती. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तसे संकेत दिले होते. तर राहुल यांनी आदेश दिले तर मी कुठूनही लढायला तयार आहे असं वक्तव्य प्रियंका गांधी यांनीही केलं होतं. त्यामुळे वाराणसीत उभं राहून प्रियंका या मोदींना चेकमेट देतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसने ती जोखीम घेतली नाही.

सर्व देशात भाजपविरुद्ध वातावरण असताना काँग्रसने उत्तर प्रदेशात कच खाल्ली. प्रियंका वाराणसीतून लढल्या असत्या तर देशाचं लक्ष वेधलं गेलं असतं असं मत व्यक्त केलं जातेय. तर काँग्रेससारखा मोठा पक्ष हा खूप दूरचा विचार करतो. फक्त लढणं हे काही उद्दीष्ट असू शकत नाही असं उत्तर काँग्रेसने भाजपला दिलं आहे.

काँग्रेसने काय करावं हे आम्हाला कुणीही सांगू शकत नाही.  असंही काँग्रेसने म्हटलं आहे. तर वाराणसीतून लढण्याची खुद्द प्रियंका गांधी यांचीच इच्छा नव्हती असं स्पष्टिकरण सॅम पित्रोदा यांनी दिलंय. त्यामुळे ही चर्चा आता आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

First published: April 26, 2019, 8:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading