पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मुस्लिम महिलांना हे आवाहन...!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं मुस्लिम महिलांना हे आवाहन...!

'आमचं सरकार सर्वच धर्मांचा आदर करतं. कुणाबद्दलही आमच्या मनात वेगळे विचार नाहीत. भारताचा घटना हाच माझा धर्म आहे.'

  • Share this:

बदोही (उत्तर प्रदेश) 05 मे : लोकसभेच्या पाचव्या टप्प्याच्या मतदानाला एक दिवस राहिला आहे. असं असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुस्लिम महिलांना एक आवाहन केलंय. भाजपचं सरकार मुस्लिम महिलांना त्यांचे हक्क देण्यासाठी कटीबद्ध आहे असं त्यांनी बदोही इथल्या प्रचासभेत बोलताना सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले, आमचं सरकार सर्वच धर्मांचा आदर करतं. कुणाबद्दलही आमच्या मनात वेगळे विचार नाहीत. भारताचा घटना हाच माझा धर्म आहे. मुस्लिम महिलांना त्यांचे हक्क मिळावेत याचसाठी आम्ही तिहेरी तलाकचं विधेयक आणलं. मात्र काँग्रेसने त्याला विरोध केला.

अनेक मुस्लिम देशांमध्ये तिहेरी तलावर बंदी आहे. असं असताना भारतात ही जुनाट प्रथा का सुरू ठेवावी असा सवालही त्यांनी केला. भारतीय राज्य घटनेने महिला आणि पुरुषांना समान अधिकार आणि हक्क दिले आहेत. इतर मुस्लिम देशांमध्ये जे अधिकार महिलांना दिले जातात तेच अधिकार इथल्या महिलांनाही मिळाल पाहिजे. महिला शिकल्या, प्रगत झाल्या तरच कुटुंबाचा, समाजाचा आणि देशाचाही विकास होईल.

ते म्हणाले, देशात चार पद्धतीचे पक्ष आहेत एक नामपंथी, दुसरे वामपंथी, तीसरे दाम आणि दमनपंथी आणि चौथे विकासपंथी. या विकास पंथी पक्षामुळेच देशाच विकास होईल. नाहीतर देशाचा विकास खुटंला जाईल असा टोलाही त्यांनी काँग्रेसला लगावला.

नोटबंदीचं राजकारण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं धाडसी पाऊल समजला जाणारा नोटबंदीचा निर्णय हा स्वतंत्र भारतातला सर्वात मोठा घोटाळा असल्याची टीका माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी केली आहे. मोदींच्या धोरणामुळे देशाची अर्थव्यवस्था अतिशय वाईट स्थितीत पोहोचली असल्याची टीकाही त्यांनी केली. देशाला एका नव्या दमाच्या नेत्याची गरज असल्याचंही त्यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नोटबंदीचा अतिशय धाडसी पाऊल असा उल्लेख करतात. या निर्णयामुळे काळ्यापैशाला आळा बसला असा दावाही त्यांच्याकडून करण्यात येतो. मात्र विख्यात अर्थतज्ज्ञ असलेल्या मनमोहन सिंग यांनी या निर्णयावर जोरदार टीका केलीय. ते म्हणाले, नोटबंदीमुळे अर्थव्यवस्थेला मोठा धक्का बसलाय त्या धक्क्यातून अर्थव्यवस्था अजुनही सावरेली नाही.

देशाची जनता परिवर्तनाच्या तयारीत आहे. लोकांना बदल हवा आहे. सबका साथ सबका विकास हा या सरकारचा मंत्र नाही तर लोकांच्या मनात व्देष निर्माण करणं हेच सरकारचं काम आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.  या आधी राहुल गांधी यांनीही मोदी यांच्यावर नोटबंदीवरून जोरदार टीका केली होती.

First published: May 5, 2019, 6:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading