'भ्रष्टनाथ' काहीही म्हणाले तरी भ्रष्टाचारावर कारवाई आवश्यक - PM मोदी

'भ्रष्टनाथ' काहीही म्हणाले तरी भ्रष्टाचारावर कारवाई आवश्यक - PM मोदी

नरेंद्र मोदी यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्यावर काँग्रेसवर टीकास्त्र डागलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 एप्रिल : मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घरी आयकर विभागानं धाड टाकली. त्यामध्ये ओसडी प्रविण कक्कड यांचा देखील समावेश झाला. यावरून देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला. नॅशनल हेराल्ड आणि चारा घोटाळा काँग्रेसच्या कार्यकाळात झाले. तसेच कमलनाथ यांच्या जवळच्या व्यक्तींच्या घरावर आयकर विभागानं छापेमारी केली. त्यावर विचारले असता नरेंद्र मोदी यांनी घोटाळेबाजांवर कारवाई केली जाईल. जो कुणी गुन्हा करेल त्याला कायदेशीर कारवाईचा सामना करावा लागेल असं स्पष्ट केलं. 'न्यूज18 नेटवर्क'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यांनी याबाबत भाष्य केलं. 'न्यूज18 नेटवर्क'चे एडीटर इन चीफ राहुल जोशी यांनी नरेंद्र मोदी यांची मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी अनेक मुद्यांवर आपली भूमिका स्पष्ट केली.

जम्मू - काश्मीरमधील कलम 35A, 370वर काय बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

काँग्रेसवर आरोप

तसेच तुम्ही काँग्रेसकडे का बोट दाखवता? असा सवाल करताच नरेंद्र मोदी यांनी मी भ्रष्टाचाराच्याविरोधात असल्याचं म्हटलं. यावेळी त्यांनी आयकर विभागाच्या कारवाईचा हवाला देत भ्रष्टाचाराविरोधात कारवाई करावी की नाही? असा सवाल केला.

यावेळी त्यांनी नॅशनल हेराल्ड केस, लालू प्रसाद यादव यांनी केलेला चारा घोटाळा आमच्या काळात झाला का ? असा सवाल केला. शिवाय ज्यांनी घोटाळा केला आहे त्यांना शिक्षा होणारच याचा पुनरूच्चार केला.

मुलखतीदरम्यान नरेंद्र मोदी यांनी सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर देखील नॅशन हेराल्ड केसच्या मुद्यावरून टीका केली. जो भ्रष्टाचार करेल त्याला शिक्षा होणारच असं देखील नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं. तसेच भ्रष्टाचाराला नष्ट करणं हा भाजप सरकारचा अजेंडा असल्याचं मोदी यांनी म्हटलं आहे.

मध्य प्रदेशसह तीन राज्यांमध्ये आयकर विभागानं कारवाई केली. यामध्ये 281 कोटी रूपये जप्त करण्यात आले होते.

मायावतींना 'ते' विधान भोवणार? काय म्हणाल्या पाहा VIDEO

First published: April 9, 2019, 12:30 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading