NYAY योजना म्हणजे 60 वर्षे केलेल्या अन्यायाचा कबुलीनामा - नरेंद्र मोदी

NYAY योजना म्हणजे 60 वर्षे केलेल्या अन्यायाचा कबुलीनामा - नरेंद्र मोदी

'अब होगा न्याय' या काँग्रेसच्या घोषणेवरून आता नरेंद्र मोदी यांनी अनेक सवाल केले आहेत.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या NYAY योजनेवर जोरदार हल्लाबोल केला आहे. काँग्रेसची NYAY योजना म्हणजे 60 वर्षे केलेल्या अन्यायाचा कबुलीनामा असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. 'न्यूज18 नेटवर्क'चे एडीटर इन चीफ राहुल जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची Exclusive मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला. शिवाय, काँग्रेसच्या 'अब न्याय होगा' घोषणेवर देखील त्यांनी प्रहार केले. 2019मध्ये सत्तेत आल्यास गरिबांच्या खात्यात दरमहा 6 हजार रूपये जमा करण्याचे आश्वासन दिलं आहे. म्हणजेच वार्षिक 72 हजार रूपये हे गरिबांच्या खात्यावर जमा केले जाणार आहेत.

NYAY योजना गेम चेंजर ठरेल का? असा सवाल केला असता त्यांनी 'अब होगा न्याय' या घोषणेचा हवाला देत 60 वर्षे काँग्रेसनं अन्याय केल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली.

'भ्रष्टनाथ' काहीही म्हणाले तरी भ्रष्टाचारावर कारवाई आवश्यक - PM मोदी

आणखी काय बोलले नरेंद्र मोदी

यावेळी त्यांनी 1984च्या दंगलीचा हवाला देत काँग्रेसला लक्ष केलं. तुम्ही जर न्यायाची भाषा करता तर 1984मधील पीडितांना न्याय केव्हा देणार? असा सवाल नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला यावेळी केला. तसेच तिहेरी तलाकवर काँग्रेसची भूमिक काय? राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये देखील सत्तेत आल्यानंतर 10 दिवसांमध्ये कर्जमाफीची घोषणा काँग्रेसनं केली. त्याचं काय झालं? तर, भोपाळ गॅस दुर्घटनेवरून देखील नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.

वैज्ञानिक तंबी नारायण यांना देखील काँग्रेसनं खोट्या केसमध्ये अडकवून जेलमध्ये पाठवलं. त्यांना आता काँग्रेस न्याय देणार? समझोता बॉम्ब स्फोटातील लोक देखील न्यायाची मागणी करत आहेत अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या 'अब न्याय होगा' घोषणेवर अनेक सवाल केले.

हिंदु या शब्दासह काँग्रेसनं दहशतवादी हा शब्द जोडला. त्यावरून देशातील हिंदु आता काँग्रेसकडे उत्तर मागत आहेत. नरसिंह राव यांनी काँग्रेससाठी मोठं कार्य केलं. पण, त्यांचा मृतदेह काँग्रेसच्या कार्यालयात आणला गेला नाही. त्यांचा आत्मा देखील आता न्याय मागत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

देशातील महापुरूष डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सुभाषचंद्र बोस, सरदार वल्लभभाई पटेल देखील न्याय मागत आहेत. इतिहासामध्ये त्यांना योग्य स्थान का नाही मिळालं? असा सवाल देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला आहे. देशातील प्रत्येक भागातून आता न्यायाची मागणी केली जात आहे. त्यांना काँग्रेस न्याय देणार का? असा सवाल देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी केला.

VIDEO: देशद्रोह्यांना फासावर लटकवणारं सरकार हवंय, की त्यांना दूध पाजणारं?-उद्धव ठाकरे

First published: April 9, 2019, 1:22 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading