जम्मू - काश्मीरमधील कलम 35A, 370वर काय बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

जम्मू - काश्मीरमधील कलम 35A, 370वर काय बोलले पंतप्रधान नरेंद्र मोदी

'न्यूज18 नेटवर्क'ला दिलेल्या मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जम्मू - काश्मीरमधील कलम 35A, 370वर भूमिका स्पष्ट केली.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 एप्रिल : सत्तेत आल्यानंतर जम्मू - काश्मीरमधील कलम 35A, 370 हटवणार असल्याचं भाजपनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. त्याबाबत 'न्यूज18 नेटवर्क'ला दिलेल्या Exclusive मुलाखतीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रश्व विचारण्यात आले. यावर बोलतना नरेंद्र मोदी यांनी कलम 35A, 370 जम्मू - काश्मीरच्या विकासामध्ये अडथळा ठरत असल्याचं म्हटलं आहे. त्यामुळे त्यावर तोडगा गरजेचा असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्पष्ट केलं.'न्यूज18 नेटवर्क'चे एडिटर - इन - चीफ राहुल जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यावर काही प्रश्व विचारले. त्यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. कलम 35A, 370 हटवल्यास जम्मू - काश्मीरचा विकास शक्य आहे. यापूर्वीच्या सरकारनं याकडे दुर्लक्ष केल्याची टीका देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी केली आहे.

जम्मू - काश्मीरमधील मुलं हुशार

जम्मू - काश्नीरमध्ये अनेक मुलं हुशार आहेत. आज अनेक मुलं देशातील विद्यापीठांमध्ये शिक्षण घेत आहेत. राज्याच्या विकासासाठी पैशांची कमी नाही. केवळ दृष्टीकोन बदलला पाहिजे. असं देखील नरेंद्र मोदी यांनी यावेळी स्पष्ट केलं.

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात AFSPA हटवण्याचा उल्लेख, नरेंद्र मोदींची टीका

शिक्षक जात नाहीत

यावेळी नरेंद्र मोदी यांनी काही उदाहरणं देखील दिली. जम्मू - काश्मीरमध्ये IIMची निर्मिती केली तरी कुणी शिक्षक त्याठिकाणी जायला तयार होत नाही. कारण, प्रोफेसर त्याठिकाणी गेल्यास त्यांच्या मुलांना शाळेत प्रवेश मिळत नाही. त्यांना घर मिळत नाही. या कायद्यामुळे जम्मू - काश्मीरमधील लोकांचं खूप नुकसान झालं आहे. पंडित नेहरू यांनी केलेल नियम आता विकासाच्या आड येत असल्याचं नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. त्यावर पुन्हा एकदा विचार होणं गरजेचं आहे असं नरेंद्र मोदी म्हणाले.

विरोधकांवर टीकास्त्र

नरेंद्र मोदी यांनी यावेळी काही राजकीय घराण्यांवर थेट हल्लाबोल केला. काश्मीरमधील समस्यांच्या मागे काही राजकीय कुटुंब आहेत. त्यांनी खूप वर्षे सत्ता भोगली. पण, त्यामुळे सामान्यांना काहीही फायदा झाला नाही. सत्ताधाऱ्यांनी केवळ मलाई खाल्ली. घाटीमध्ये काही असे लोक आहेत ज्यांनी 50 वर्षे सत्ता भोगली. पण विकास नाही केला. आता जम्मू - काश्मीरमधील जनतेला विकास हवा. अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

मायावतींना 'ते' विधान भोवणार? काय म्हणाल्या पाहा VIDEO

First published: April 9, 2019, 11:39 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading