VIDEO नोटबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी मंत्रिमंडळालाच ठेवलं होतं कोंडून, राहुल गांधींचा आरोप

VIDEO नोटबंदीचा निर्णय घेताना पंतप्रधानांनी मंत्रिमंडळालाच ठेवलं होतं कोंडून, राहुल गांधींचा आरोप

'लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्यासारखे अनुभवी नेते भाजपकडे आहेत. मात्र त्यांना काहीही विचारालं जात नाही.'

  • Share this:

सोलोन (हिमाचल प्रदेश)17 मे : लोकसभेच्या सातव्या टप्प्याच्या निवडणूक प्रचाराचा शुक्रवार हा शेवटचा दिवस आहे. या शेवटच्या दिवशी सर्वच बड्या नेत्यांनी आपला अखेरचा डाव टाकला. हिमाचल प्रदेशातल्या सोलोन इथं प्रचार सभेत बोलताना राहुल गांधी यांनी गंभीर आरोप केलाय. नरेंद्र मोदी यांची शैली एकाधिकारशाहीची आहे ते कुणालाच विचारत नाहीत. नोटबंदीचा निर्णय घेतांना त्यांनी अख्या मंत्रिमंडळालाच एका खोलीत कुलूप लावून कोंडून घेतलं होतं अशी टीका त्यांनी केली.

निवडणुकीच्या प्रचारात राफेल सोबतच नोटबंदी हा विषय राहूल गांधी यांनी लावून धरला होता. नोटबंदीमुळे सामान्य माणसाचं कंबरडं मोडलं अशी टीका त्यांनी केली. ते म्हणाले, सात रेसकोर्सवर मंत्रिमंडळाची बैठक होती. त्याच बैठकीत पंतप्रधानांनी नोटबंदीचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय घेताना त्यांनी सर्वांना कोंडून घेतलं.

आपली सुरक्षा करणाऱ्या SPGच्या सुरक्षा जवानांनीच ही माहिती दिली असंही त्यांनी सांगितलं. लालकृष्ण अडवाणी, अरुण जेटली, सुषमा स्वराज यांच्यासारखे अनुभवी नेते भाजपकडे आहेत. मात्र त्यांना काहीही विचारालं जात नाही असंही ते म्हणाले.

काँग्रेस पंतप्रधानपदासाठी तयार

काँग्रेसचे नेते गुलाम नबी आझाद यांनी आता पलटी मारली आहे. काँग्रेस पंतप्रधानपदासाठी इच्छुक नाही हे खरं नाही. काँग्रेस हाच सर्वात मोठा आणि जुना पक्ष असल्याने सत्ता स्थापनेसाठी आम्हालाच सर्वात आधी निमंत्रित करायला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलंय. पाच वर्ष स्थिर सरकार चालवायचं असेल तर काँग्रेसच सर्वात योग्य पक्ष आहे असंही ते म्हणाले. या आधी त्यांनी नरेंद्र मोदी यांना सत्तेतून हटवणं हेच काँग्रेसचं सर्वात मुख्य उद्दीष्ट आहे असं म्हटलं होतं.

या आधी गुरुवारी त्यांच्या वक्तव्याची देशभर चर्चा झाली होती. पंतप्रधानपदासाठी काँग्रेसला ऑफर दिली नाही तरी पक्ष तो प्रतिष्ठेचा मुद्दा करणार नाही असं त्यांनी बिहारमध्ये बोलताना स्पष्ट केलं होतं. भाजप आणि नरेंद्र मोदींना सत्तेपासून दूर ठेवणं हेच आमचं मुख्य धोरण आहे असंही ते म्हणाले होते.

First published: May 17, 2019, 3:35 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading