आता दहशतवाद्यांची सुटका नाही, हा नवा भारत आहे - नरेंद्र मोदी

काशीच्या लोकांनी मला खासदार होण्याचा आणि पंतप्रधान होण्याचा आशीर्वाद दिलाय.

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 10:11 PM IST

आता दहशतवाद्यांची  सुटका नाही, हा नवा भारत आहे - नरेंद्र मोदी

वाराणसी 25 एप्रिल : चार तासांच्या रोड शो नंतर आणि गंगेच्या आरतीनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या मतदार संघातल्या लोकांशी संवाद साधला. देशातले लोक बदलाचा अनुभव घेत आहेत. हा नवा भारत आहे. हा देश आता आघात करणाऱ्या दहशतवाद्यांना सोडणार नाही. शांततेचा खोटा बुरखा पांघरणाऱ्या लोकांचाही आम्ही खरा चेहेरा दाखवला असं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगतलं.

पंतप्रधान म्हणाले, गेल्या पाच वर्षात सुरक्षा व्यवस्था मजबूत झाली आहे. देशातल्या पवित्र स्थानांची सुरक्षा व्यवस्था अधिक मजबूत झाली आहे. दहशतवादी घटनांना पायबंद घालण्यात आम्ही यश मिळवलं असंही ते म्हणाले.

काशीच्या लोकांनी मला खासदार होण्याचा आणि पंतप्रधान होण्याचा आशीर्वाद दिलाय. देशासाठी कठोर पावलं उचलण्याची शक्ती याच नगराने दिली. आता आणि बदल करण्याची शक्तीही काशीच देईल असंही ते म्हणाले.

रोड शोला तुफान प्रतिसाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वारणसीतून उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भव्य रोड शो केला. या रोड शो साठी प्रचंड सुरक्षा व्यवस्था तैनात ठेवण्यात आली होती. मोदी उघड्या गाडीतून लोकांना अभिवान करत निघाले तेव्हा त्यांच्या समर्थकांनी प्रचंड जल्लोषात त्यांचं स्वागत केलं.

पंतप्रधानांबरोबर या रोड शो मध्ये भाजपचे अनेक ज्येष्ठ नेते सामील झाले. त्यामध्ये गृहमंत्री राजनाथ सिंह, अमित शहा, योगी आदित्यनाथ यांचाही समावेश आहे. या भव्य रोड शो नंतर दशाश्वमेध घाटावरून नरेंद्र मोदी गंगा आरतीमध्ये सामील झाले. मोदींनी स्वतः मंत्रोच्चारांच्या गजरात गंगेची आरती केली.

बनारसच्या प्रसिद्ध लंका गेटपासून दशाश्वमेध घाटापर्यंत हा रोड शो झाला. हा 5 किमी चा रस्ता मोदींच्या चाहत्यांनी भरून गेलेला होता. मोदी मोदी घोषणा देण्यात येत होत्या. रस्त्यात 20 ठिकाणी मोदींवर पुष्पवर्षाव करण्यात आला. त्यासाठी 25 क्विंटल गुलाबाच्या पाकळ्या वापरल्या गेल्या. कार्यकर्त्यांचा आणि समर्थकांचा उत्साह प्रचंड मोठ्या प्रमाणावर वाराणसीमध्ये दिसला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 10:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close