VIDEO 'नरेंद्र मोदींची लाट नाही तर फुगा, लवकरच तो फुटेल'

VIDEO 'नरेंद्र मोदींची लाट नाही तर फुगा, लवकरच तो फुटेल'

सरकारबद्दल लोकांची थोडी नाराजीही दिसते. मात्र मत कुणाला देणार असं विचारल्यावर मात्र तो मत मोदींनाच देणार असं सांगतोय.

  • Share this:

नवी दिल्ली 26 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कुठलीही आश्वासनं पूर्ण केली नाहीत. फक्त जाहीरातबाजी करून लोकांना भुलविण्याचं काम सुरू आहे. नरेंद्र मोदी यांची लाट नाही तर तो फक्त फुगा आहे, 23 मे रोजी तो फुगा फुटेल आणि लोकांचा भ्रनिरास होईल अशी टीका काँग्रेसने केली आहे. काँग्रेसचे प्रवक्ते अलोक शर्मा यांनी 'सीएनबीसी-आवाज'च्या चुनाव अड्डा या कार्यक्रमात बोलताना बोलतना केली.

अजुनही मोदींवरच विश्वास

2019 च्या निवडणुकीतही मोदीच केंद्र स्थानी आहे. सर्व्हेंमध्येही जेव्हा लोकांना विचारण्यात येतं तेव्हा ते सांगतात की बेरोजगारी आहे, शेतीचे प्रश्न, रोजगाराचा प्रश्न आहे. सरकारबद्दल त्यांची थोडी नाराजीही दिसते. मात्र मत कुणाला देणार असं विचारल्यावर मात्र तो मत मोदींनाच देणार असं सांगतोय.

त्याचं कारण म्हणजे त्यांचा मोदींवर विश्वास आहे. ते काहीतरी करतील असं लोकांना वाटतं. त्यामुळे 2014 पेक्षाही ही निवडणूक जास्त मोदी केंद्रीत आहे असं मत आघाडीची सर्व्हेक्षण संस्था असलेल्या CSDSचे संचालक संजय कुमार यांनी सांगितलं.

मोदींना पर्याय नाही

या देशातल्या सर्व विरोधीपक्षांनी फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनाच टार्गेट केलंय. ते भाजपविरुद्ध फारसे बोलत नाहीत त्यांना फक्त मोदीच नकोय. पण जेव्हा त्यांना मोदींना तुमच्याकडे पर्याय काय आहे असं जेव्हा विचारलं जातं तेव्हा त्यांच्याकडे पर्याय नसतो. जे विरोधी पक्ष एकत्र येत नाहीत ते निवडणुकीनंतर एकत्र येतील असा लोक कसा विश्वास ठेवतील? आणि कसं सरकार चालवतील? असा प्रश्न ज्येष्ठ पत्रकार रामकृपाल सिंह केलाय.

विरोधक जेवढं मोदींना टार्गेट करतील तेवढं भाजपला फायद्याचं आहे असं मतही त्यांनी नोंदवलं. काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविरुद्ध लढू शकतात अशी शक्यता काँग्रेसकडूनच व्यक्त केली जात होती. पक्षाचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी तसे संकेत दिले होते. तर राहुल यांनी आदेश दिले तर मी कुठूनही लढायला तयार आहे असं वक्तव्य प्रियंका गांधी यांनीही केलं होतं. त्यामुळे वाराणसीत उभं राहून प्रियंका या मोदींना चेकमेट देतील अशी शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र काँग्रेसने ती जोखीम घेतली नाही.

काँग्रेसने कच खाल्ली

सर्व देशात भाजपविरुद्ध वातावरण असताना काँग्रसने उत्तर प्रदेशात कच खाल्ली. प्रियंका वाराणसीतून लढल्या असत्या तर देशाचं लक्ष वेधलं गेलं असतं असं मत व्यक्त केलं जातेय. तर काँग्रेससारखा मोठा पक्ष हा खूप दूरचा विचार करतो. फक्त लढणं हे काही उद्दीष्ट असू शकत नाही असं उत्तर काँग्रेसने भाजपला दिलं आहे.

काँग्रेसने काय करावं हे आम्हाला कुणीही सांगू शकत नाही.  असंही काँग्रेसने म्हटलं आहे. तर वाराणसीतून लढण्याची खुद्द प्रियंका गांधी यांचीच इच्छा नव्हती असं स्पष्टिकरण सॅम पित्रोदा यांनी दिलंय. त्यामुळे ही चर्चा आता आणखी रंगण्याची चिन्हे आहेत.

 

First Published: Apr 26, 2019 10:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading