News18 Lokmat

अडवाणींचं म्हणणं योग्य; विरोधक 'राष्ट्रविरोधी' नाहीत - नरेंद्र मोदी

राजकीय विरोधक हे 'देशविरोधी' नाहीत हे लालकृष्ण अडवाणींचं विधान योग्य असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 04:03 PM IST

अडवाणींचं म्हणणं योग्य; विरोधक 'राष्ट्रविरोधी' नाहीत - नरेंद्र मोदी

नवी दिल्ली, 09 एप्रिल : राजकीय विरोधक हे 'देशविरोधी' नाहीत हे लालकृष्ण अडवाणींचं विधान योग्य असल्यानं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. 'न्यूज18 नेटवर्क'चे एडिटर इन चीफ राहुल जोशी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची खास मुलाखत घेतली. त्यावेळी त्यांनी विरोधकांबद्दल लालकृष्ण अडवाणी यांनी केलेल्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं आहे. आज देखील आम्ही लालकृष्ण अडवाणी यांच्या मताशी सहमत आहोत असं नरेंद्र मोदी म्हणाले.

लालकृष्ण अडवाणी यांनी काही दिवसांपूर्वी नेशन फर्स्ट, पार्टी नेक्स्ट, सेल्फ लास्ट असं म्हटलं होत. त्यावर ट्विट करून नरेंद्र मोदी अडवाणी यांच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं होतं. शिवाय, भाजपला विरोध करणाऱ्यांना राष्ट्र विरोधी म्हणणं चुकीचं असल्याचं देखील अडवाणी यांनी म्हटलं होतं.


'काँग्रेसचं तर ठीक आहे शरद पवार तुम्ही सुद्धा...?' मोदींचा हल्लाबोल


Loading...

आणखी काय म्हणाले नरेंद्र मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील अडवाणी यांच्या मताशी सहमत असल्याचं म्हटलं होतं. मी आणि भाजप कार्यकर्ते अडवाणी यांच्या मताशी सहमत आहोत. विरोधक मर्यादा मोडत आहेत. काँग्रेसच्या एका नेत्यानं अटलबिहारी वाजपेयी यांना गद्दार आणि देशद्रोही म्हटलं होतं. त्यामुळे आम्ही अडवाणी यांच्या मताशी सहमत असून विरोधकांना राष्ट्रविरोधी म्हणणं ही बाब मान्य नसल्याचं म्हटलं आहे.

गांधीनगर लोकसभा मतदार संघातून लालकृष्ण अडवाणी यांना उमेदवारी नाकारली गेली. यानंतर अडवाणी यांनी लिहिलं होतं की, भाजपनं आपल्या विरोधकांना शत्रु मानलं नाही. शिवाय, आम्ही त्यांना कधी राष्ट्रविरोधी म्हणून देखील मानलं नाही. दरम्यान, अडवाणी यांचं हे विधान भाजपच्या राष्ट्र विरोधी शब्दाविरोधात असल्याचं मानलं जात होतं.


VIDEO: प्रियांकांच्या रॅलीत 'मोदी.. मोदी..'च्या घोषणा; कार्यकर्ते आपसात भिडले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 04:03 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...