नरेंद्र मोदींनी आपल्या 'गुरू'लाच मारला जोरदार फटका - राहुल गांधी

नरेंद्र मोदींनी आपल्या 'गुरू'लाच मारला जोरदार फटका - राहुल गांधी

'नरेंद्र मोदी हे गरिबी, बेरोजगारी, महागाई या शत्रूंना ते जोरदार फटके मारतील असं वाटलं होतं मात्र तसं झालं नाही.'

  • Share this:

भिवानी (हरियाना) 06 मे : लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला जस जसा रंग चढतोय तस तसं नेत्यांच्या विधानांमुळे नव नवे वाद निर्माण होत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधींबाबत केलेल्या विधानांवरून सुरू झालेला राजकीय वाद अजुन शांत झालेला नाही. असं असतनाच काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या वक्तव्याने नवा वाद निर्माण झालाय.


हरियानातल्या भिवानी इथं झालेल्या प्रचार सभेत राहुल गांधी मोदींवर टीका करताना म्हणाले, नरेंद्र मोदी यांनी आपले गुरू असलेल्या लालकृष्ण अडवानी यांनाच आपल्या मार्गातून दूर केलं. हे सांगण्यासाठी त्यांनी मोदींना एका बॉक्सरची उपमा दिली. ते म्हणाले नरेंद्र मोदी हे उत्तम बॉक्सर आहेत असं देशातल्या जनतेला वाटलं. गरिबी, बेरोजगारी, महागाई या शत्रूंना ते जोरदार फटके मारतील असं वाटलं होतं मात्र तसं झालं नाही.या बॉक्सरची लढाई बघायला लालकृष्ण अडवाणी, नितीन गडकरी, अरुण जेटली असे सर्व सहकारी आले होते. पण या बॉक्सरने मैदानात आल्याबरोबर आपले गुरू असलेल्या अडवाणींनाच जोरदार फटका मारला. त्यानंतर हा बॉक्सर नितीन गडकरी, अरुण जेटली यांच्या मागे लागला असं सांगत त्यांनी नरेंद्र मोदींनी आपल्या गुरूलाच आपल्या मार्गातूनच दूर केलं असं सूचित केलं.काँग्रेसलाच बसेल पंच

राहुल गांधींच्या यांच्या या वक्तव्यावर भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी जोरदार टीका केलीय. येत्या 23 मे रोजी देशातली जनताच राहुल गांधी यांना जोरदार फटके मारतील असं ते म्हणाले. काँग्रेसने भ्रष्टाचाराला पंच मारण्या ऐवजी त्यांना वाचविण्याचं काम केलं असंही जावडेकर म्हणाले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 6, 2019 05:15 PM IST

ताज्या बातम्या