काँग्रेसमधला 'परिवार' फक्त दलाली करतो - नरेंद्र मोदी

काँग्रेसमधला 'परिवार' फक्त दलाली करतो - नरेंद्र मोदी

'काँग्रेसच्या या दलालीमुळेच सैन्याची शक्ती कमी झाली. भाजप सरकार सैन्यदलाला काहीही कमीपडू देणार नाही.'

  • Share this:

पणजी,10 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गोव्यात झालेल्या प्रचार सभेत पुन्हा एकदा काँग्रेस आणि गांधी घराण्यावर जोरदार हल्लाबोल केला. काँग्रेस पक्षातला एक परिवार हा कायम दलाली करतो असा आरोप त्यांनी गांधी घराण्याचं नाव न घेता केला.

काँग्रेसच्या या दलालीमुळेच सैन्याची शक्ती कमी झाली. ऑगस्टावेस्टलँड प्रकरणातला आरोपी मिशेल याला पळून जाण्यात काँग्रेसनेच मदत केली होती. त्यांना माहित नव्हतं की मोदी सत्तेत आल्यावर त्याला परत आणणार. पण आता तो अनेक खुलासे करत आहे असंही त्यांनी सांगितलं.

आपल्या भाषणात पंतप्रधानांनी माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचीही आठवण केली. मोदी म्हणाले, पर्रिकरांचं सरकार घालविण्यासाठी काँग्रेसने खूप प्रयत्न केले पण त्यांना यश आलं नाही. काँग्रेस हा सत्तेसाठी हपापलेली आहे. पर्रिकरांचं अपूर्ण स्वप्न नवं सरकार पूर्ण करेल अशी ग्वाहीही त्यांनी दिली.

शरद पवारांची मोदींवर टीका

लोकसभेच्या पहिल्या टप्प्यातल्या मतदानाला आता फक्त एक दिवस राहिलाय. देशभरातला प्रचार शिगेला पोहोचलाय. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी 'न्यूज18 लोकमत' खास मुलाखत देऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांपर्यंत सगळ्यांवर परखड मतं व्यक्त केली. 'न्यूज18 लोकमत' चे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी ही मुलाखत घेतली आहे.

मुख्यमंत्र्यांवर टीका

या मुलाखतीत पवारांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर पवारांनी जोरदार हल्लाबोल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे बालीश आहेत. त्यांच्या बालसुलभ वागण्याकडे मी दुर्लक्ष करतो. लहान मुलांच्या बोलण्याकडे फारसं गांभार्याने बघायचं नसतं अशी टीका त्यांनी मुख्यमंत्र्यांवर केली.

मोदींना घरपण माहित नाही

पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातल्या सभेत सातत्याने शरद पवारांना टार्गेट करत आहेत. त्यावरही पवारांनी या मुलाखतीत भाष्य केलं. पवार म्हणाले, मोदींना पवार कुटुंबांशीवाय दुसरं काहीच दिसत नाही. त्यांना सर्वच ठिकाणी पवार कुटुंब दिसतं. एकत्र कुटुंबाची ताकद काय असते याची जाणीव आम्हाला आहे.

मोदी हे कायम एकटे राहत असल्याने त्यांना कुटुंबाचं ममत्व माहित नाही असा टोलाही त्यांनी लगावला. मोदी माझ्याविषयी जाणीवपूर्वक संभ्रम निर्माण करत आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

First published: April 10, 2019, 7:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading