काँग्रेसच्या जाहीरनाम्यात AFSPA हटवण्याचा उल्लेख, नरेंद्र मोदींची टीका

नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 9, 2019 10:47 AM IST

काँग्रेसच्या जाहीरनाम्यात AFSPA हटवण्याचा उल्लेख, नरेंद्र मोदींची टीका

नवी दिल्ली, 09 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली आहे. सत्तेत आल्यास जम्मू - काश्मीरमधून AFSPA हटवण्याचं काँग्रेसनं आपल्या जाहीरनाम्यात म्हटलं आहे. यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं. 'न्यूज18 नेटवर्क'चे एडीटर इन चीफ राहुल जोशी यांनी नरेंद्र मोदी यांची exclusive  मुलाखत घेतली. त्यावेळी बोलत असताना त्यांनी 'AFSPA हटवणं म्हणजे जवानांना फासावर चढवण्यासारखं आहे. सैन्याचा आत्मविश्वास कायम ठेवण्यासाठी AFSPA गरजेचं' असल्याचं म्हणत नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला केला.

'अशांत भागात AFSPA गरजेचा आहे. AFSPAला रद्द करण्यासाठी परिस्थितीत बदल होणं गरजेचं आहे. पहिल्यांदा आम्ही अरूणाचलमधील काही जिल्ह्यांमधून AFSPA हटवला. 1980मध्ये आमची सत्ता असताना याबाबत पावलं उचलली गेली. पण, आम्ही कायदा - सुव्यवस्था कायम ठेवली.'


'मायावती बुडणारं जहाज वाचण्यासाठी घेत आहेत मुस्लिमांचा आधार'


काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय आहे उल्लेख

काँग्रेसनं आपला जाहीरनामा प्रसिद्ध केला असून त्यामध्ये AFSPA हटवण्याचा उल्लेख करण्यात आला आहे. शिवाय, देशद्रोहा संदर्भातील कायद्यावर देखील विचार केला जाईल असं म्हटलं आहे. यावर भाजपनं जोरदार टीका केली आहे. त्यानंतर काँग्रेसनं आपली बाजू देखील मांडली आहे.

याच मुद्यावरून भाजपनं काँग्रेस दहशतवाद्याच्या मुद्यावर गंभीर नसल्याचा आरोप केला आहे. दहशतवादाच्या मुद्यावर काँग्रेस आणि पाकिस्तानचे विचार सारखे असल्याची टीका भाजपनं केली होती. AFSPA हटवणं म्हणजे सैनिकांच्या हातून शस्त्र काढण्यासारखं असल्याचं भाजपनं म्हटलं आहे.


मायावतींवर देखील टीका

बसपा प्रमुख मायावती यांचा प्रभाव आता राहिला नाही. एका बुडणाऱ्या जहाजाप्रमाणे त्यांची आता अवस्था झाली आहे. त्यापासून वाचण्यासाठी त्या आता मुस्लिमांचा आधार घेत असल्याची टीका नरेंद्र मोदी यांनी केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तथाकथित सेक्युलर लोकांवर देखील हल्लाबोल चढवला.


मायावतींना 'ते' विधान भोवणार? काय म्हणाल्या पाहा VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 9, 2019 10:46 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close