'मायावती बुडणारं जहाज वाचण्यासाठी घेत आहेत मुस्लिमांचा आधार'

'मायावती बुडणारं जहाज वाचण्यासाठी घेत आहेत मुस्लिमांचा आधार'

  • Share this:

नवी दिल्ली, 09 एप्रिल : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बसपाच्या प्रमुख मायावती यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. 'न्यूज18 नेटवर्क'ला दिलेल्या एक्स्लुझिव्ह मुलाखतीमध्ये बसपा प्रमुख मायावती यांचा प्रभाव आता राहिला नाही. एका बुडणाऱ्या जहाजाप्रमाणे त्यांची आता अवस्था झाली आहे. त्यापासून वाचण्यासाठी त्या आता मुस्लिमांचा आधार घेत असल्याची टीका त्यांनी केली आहे. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तथाकथित सेक्युलर लोकांवर देखील हल्लाबोल चढवला.

देशात 24 तास धर्मनिरपेक्षतेचा झेंडा घेऊन फिरणाऱ्याबद्दल मला चिंता वाटू लागली आहे. त्यांच्या तोंडावर आता टाळं का लागलं आहे? हिंदूबद्दल कोण काय बोललं तर त्यावर मोठा हंगामा केला जातो. अनेक जण पुरस्कार वापसी आणि हस्ताक्षर मोहीम राबवतात. या लोकांचा खरा चेहरा समोर आणण्याची गरज देखील यावेळी नरेंद्र मोदी यांनी बोलून दाखवली.

उत्तर प्रदेशात सपा - बसपा एकत्र

लोकसभा निवडणुकीकरता सपा आणि बसपा एकत्र आले आहेत. दरम्यान, यापूर्वी मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील टीका केली होती. त्यावर आता नरेंद्र यांनी त्यांच्या शैलीत उत्तर दिलं आहे. सपा - बसपा एकत्र आल्यानं आता उत्तर प्रदेशातील लढत आणखी रंगतदार झाली आहे.

भाजपनं देखील आता लोकसभेकरता कंबर कसली आहे. सध्या जोरदर प्रचार आता भाजपकडून केला जात आहे. प्रियांका गांधी देखील आता राजकारणात सक्रीय झाल्यानं काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये जोश पाहायाला मिळत आहे. त्यामुळे भाजपला आता दुहेरी आव्हानांचा सामना करावा लागणार आहे.

VIDEO: सुभाष भामरेंचा विरोधी उमेदवार प्रचारासाठी वापरणार 'शेतकरी'अस्त्र

First published: April 9, 2019, 8:55 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading