'मोदी सरकार विरोधात नाही मात्र भाजपची प्रतिमा मुस्लिम विरोधी'

'मोदी सरकार विरोधात नाही मात्र भाजपची प्रतिमा मुस्लिम विरोधी'

'पुन्हा भाजप सत्तेत आला तर मुस्लिम काही पाताळात जाणार नाहीत किंवा काँग्रेस सत्तेत आला तर मुस्लिम आकाशात जाणार नाहीत.'

  • Share this:

नवी दिल्ली 23 एप्रिल : केंद्रातलं नरेंद्र मोदी सरकार हे मुस्लिम विरोधी नाही. मात्र भाजपचे काही नेते ज्या पद्धतीने बोलतात त्यामुळे भाजपची प्रतिमा ही मुस्लिम विरोधी झाली असे मत मुस्लिम उद्योजक आणि 2014 मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींचे कट्टर समर्थक असलेले जफर सरेशवाला यांनी व्यक्त केलंय. CNNnews18च्या Viewpoint या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे मत व्यक्त केलं.

उद्योजक असलेले जफर सरेशवाला हे काही वर्षांपूर्वी मोदींचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जात होते. मात्र 2016 नंतर ते मोदींपासून दुरावले असं म्हटले जाते. ते म्हणाले, सरकार मुस्लिमांच्या बाबतील भेदभाव करत नाही. सर्वांना समान न्याय दिला जातो. एका विद्यापीठाचा कुलगुरु असताना मी अनेक चांगल्या गोष्टी केल्या होत्या ज्या गेली 20 वर्ष झाल्या नाहीत.

मात्र भाजपचे काही नेते आणि मंत्री ज्या पद्धतीने वक्तव्य करतात त्यामुळे सरकारची प्रतिमा खराब होतेय. भाजप हा मुस्लिम विरोध आहे अशी प्रतिमा तयार झाल्याचं मतही जफर सरेशवाला यांनी व्यक्त केलं. पुन्हा भाजप सत्तेत आला तर मुस्लिम काही पाताळात जाणार नाहीत किंवा काँग्रेस सत्तेत आला तर मुस्लिम आकाशात जाणार नाहीत असंही ते म्हणाले.

मोदीची लाट नाही पण...

लोकसभा निवडणुकीचे तीन टप्पे पूर्ण झाले. प्रचाराचा झंझावत कायम आहे. अनेक सर्व्हे येत आहेत आणि लोकांना उत्सुकता आहे 23 मेला काय होणार. फिर एक बार मोदी सरकार येणार की महाआघाडीचं सरकार येणार याची चर्चा सुरू झालीय. देशात 2014सारखी लाट नसली तरी देशात परिवर्तन व्हाव असंही लोकांना वाटत नाही असं मत CSDS चे संचालक संजय कुमार यांनी व्यक्त केलं. '

देशातले आघाडीचे सेफॉलॉजीस्ट असलेले संजय कुमार म्हणाले, आत्तापर्यंतच्या तीन टप्प्यातलं मतदानाचं प्रमाण पाहिलं तर हे दिसून येतं की 2014सारखी नरेंद्र मोदी यांची लाट नाही हे खरं आहे. त्याचबरोबर देशात परिवर्तन व्हावं असंही लोकांना वाटतं नाही असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

संजय कुमार म्हणाले, मतदानाची टक्केवारी ही फार काही जास्त नाही किंवा कमीही नाही. त्यामुळे भाजपला फार काही धक्का बसेल असं वाटत नाही. काँग्रेसला सत्ता मिळवायची असेल तर त्यांना खूप मोठ्या प्रमाणावर मतं मिळवावी लागतील आणि ते सध्या तरी शक्य दिसत नाही असंही ते म्हणाले.

काँग्रेसने 'राफेल'च्या भ्रष्टाचाराचा मुद्दा जोरदारपणे उपस्थित केला होता. 'चौकिदार चोर है' ही त्यांची घोषणाही खूप गाजली पण त्यांचा फार फायदा होईल असं दिसत नाही. भारताच्या हवाई हल्ल्यानंतर प्रचाराची पूर्ण दिशाच बदलून गेली. बेरोजगारी, शेतकरी, रोजगार हे मुद्दे बाजूला पडून भारत-पाकिस्तान, हिंदू-मुस्लिम, देशभक्ती-देशद्रोही असे मुद्दे आले असा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे.

First published: April 23, 2019, 11:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading