मतदान केंद्राबाहेर वाटली नमो फूडचे पॅकेट्स

मतदान केंद्राबाहेर वाटली नमो फूडचे पॅकेट्स

नोएडामध्ये मतदान केंद्राबाहेर पोलिसांनी नमो फुड्सची पाकीटं आणली असं आरोप नागरिकांनी केला आहे.

  • Share this:

नोएडा, 11 एप्रिल : देशात लोकसभेकरता मतदानाचा पहिला टप्पा पार पडत आहे. 91 जागांकरता हे मतदान सुरू आहे. दरम्यान, नोएडामध्ये आचारसंहितेचं उल्लंघन झाल्याचा प्रकार आता समोर आला आहे. सेक्टर-15 मध्ये मतदान केंद्राबाहेर चक्क नमो फुड्सची पॅकेट्स वाटली गेली. नमो फु़ड्सची पॅकेट पोलीस आपल्या गाडीतून मतदान केंद्रबाहेर घेऊन आले असा आरोप नागरिकांनी केला आहे. त्यानंतर आता निवडणूक अधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडून याबाबतचा अहवाल मागितला आहे. पण, पोलिसांनी मात्र सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. फुड पॅकेट्स हे नमो फुड शॉपमधून खरेदी करण्यात आली. पण, ती पॅकेट्स पोलिसांनी वाटली नसल्याची माहिती पोलीस अधिक्षक वैभव कृष्णा यांनी दिली. तर, गौतमबुद्ध नगरच्या डीएमनी देखील पोलिसांवर लावण्यात आलेले आरोप फेटाळून लावले आहेत. ड्युटीवर असणारे पोलीस खाणं खाणार की नाही? असा सवाल डीएमनी विचारला आहे. फुड पॅकेट्सवर नमो नाव लिहिलं असेल तर त्याचा अर्थ चुकीचा लावू नये. कारण ते एका दुकानाचं नाव असल्याची प्रतिक्रिया दिली.

'बारामतीची चर्चा करायला चालले होते आणि आता...' थोरातांचा गिरीश महाजनांवर हल्लाबोल

काय कारवाई करणार?

दरम्यान, निवडणूक अधिकाऱ्यांनी याचा अहवाल मागितला आहे. त्यामुळे चौकशीअंती यावर काय कारवाई येणार हे पाहावं लागणार आहे. आचारसंहिता भंगाची ही काही पहिली घटना नाही. यापूर्वी देखील उत्तर प्रदेशमध्ये आचारसंहिता भंगाचे प्रकार समोर आले आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलेल्या विधानावरून देखील वाद निर्माण झाला होता.

राहुल गांधीविरुद्ध लढणार बॉलिवूडचे हे स्टार, निवडणुकीत देणार मोदींना साथ

उत्तर प्रदेशातील 8 जागांवर मतदान

दरम्यान, उत्तर प्रदेशातील 8 जागांवर लोकसभेतील पहिल्या टप्प्याचं मतदान आज पार पडत आहे. यामध्ये पश्चिम उत्तर प्रदेशातील सहारनपूर, कैराना, मुजफ्फरनगर, मेरठ, बिजनौर, गाजियाबाद आणि गौतमबुद्धनगर या लोकसभा मतदार संघाचा समावेश आहे.

VIDEO: उमेदवाराने चक्क ईव्हीएमच जमिनीवर आदळलं

First published: April 11, 2019, 1:27 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading