'भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानच्या नजरेतून पाहू नका'

'भारतीय मुस्लिमांना पाकिस्तानच्या नजरेतून पाहू नका'

'पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणांमधून आदर्श निर्माण करायला पाहिजे मात्र ते अतिशय चिथावणीखोर वक्तव्य करतात.'

  • Share this:

नवी दिल्ली 17 एप्रिल : भारतीय मुस्लिमांना कधीच पाकिस्तानच्या नजरेतून पाहू नये असं करणं हे अतिशय घातक आहे. तो जेव्हा मत द्यायला जातो तेव्हा त्याला त्याच दुष्टीकोनातून पाहिलं जातं. त्याचा दूरगामी परिणाम होतो आणि वातावरण कलुषीत होतं असं मत ज्येष्ठ पत्रकार आणि अभ्यासक रशीद किडवई यांनी व्यक्त केलंय. 'CNBC आवाज' च्या 'टक्कर' या कार्यक्रमात ते बोलत होते. पाकिस्तानशी संबंध सुधारणे आवश्यक आहे. चांगले संबंध असणं हे दोनही देशांसाठी फायद्याचं आहे. मात्र त्याचा संबंध भारतातल्या मुस्लिमांशी जोडणं पूर्णपणे अयोग्य आहे असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या भाषणांमधून आदर्श निर्माण करायला पाहिजे मात्र ते अतिशय चिथावणीखोर वक्तव्य करतात असं मत काँग्रेसचे प्रवक्ते गौरव वल्लभ यांनी व्यक्त केलं.  सगळ्याचं पक्षातल्या ज्या नेत्यांनी अशी वादग्रस्त वक्तव्य केलीत त्या सगळ्यांचाच निषेध केला पाहिजे असंही ते म्हणाले. अशा वक्तव्यांमुळे देशाचं आणि समाजाचं नुकसान होतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं.

तर काँग्रेसचे नेते वक्तव्य एक करतात आणि प्रवक्ते दुसरचं बोलतात. दर निवडणुकीत काँग्रेस पाकिस्तानची भाषा बोलतो. त्यांना भारतीय मुस्लिमांना हे दाखवून द्यायचं असतं की आम्ही तुमच्या सोबत आहोत आणि तुम्ही आम्हाला मतं दिली पाहिजे असं मत भाजपचे प्रवक्ते अमित मालवीय यांनी व्यक्त केलं.

तर निवडणुकीच्या काळात अशी वादग्रस्त वक्तव्य काही नवी नाहीत. नेते जाणीवपूर्वक अशी वक्तव्य करत असतात असं मत CSDS चे संचालक संजय कुमार यांनी व्यक्त केलं. पहिल्या टप्प्यात जे कमी प्रमाणात मतदान झालं ते भाजपसाठी काळजीचं कारण होऊ शकतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं. अशा वक्तव्यांना फार गांभीर्याने घेऊ नये असंही ते म्हणाले.

तर निवडणूक आयोगाने आणखी गंभीर कारवाई केली पाहिजे. त्यांनी सीमारेषा आखून द्यावी आणि सक्तीने त्याचं पालन करायला भाग पाडावं. पण काही लोकांना अशी वक्तव्य करण्याची सवयच लागली आहे. ही त्यांची सवय येवढ्या लवकर जाणार नाही असं मत सीव्होटरचे प्रमुख यशवंत देशमुख यांनी व्यक्त केलं.

First published: April 17, 2019, 11:52 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading