मोदींचा 1 शब्द अन् जनतेनं 13 वारसदारांना बसवलं घरी!

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात मोदींनी सातत्यानं घराणेशाहीवर टीका केली. याचाच दणका राजकीय नेत्यांच्या वारसदारांना बसला.

News18 Lokmat | Updated On: May 24, 2019 10:28 AM IST

मोदींचा 1 शब्द अन् जनतेनं 13 वारसदारांना बसवलं घरी!

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभा प्रचारावेळी घराणेशाहीवर जोरदार टीका केली होती. निवडणुकीचा निकाल जसा समोर येऊ लागला तसा मोदींच्या या टीकेचा परिणाम दिसायला लागला. यात राजकारणातल्या मातब्बर घराण्यांना त्यांची खुर्ची टिकवता आली नाही.

राजस्थानमध्ये काँग्रेसची धूळदाण उडाली. सर्वच 25 जागा काँग्रेसनं गमावल्या. यात राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांचे सुपुत्र वैभव यांचा पराभव झाला. भाजपचे उमेदवार गजेंद्र सिंह शेखावत 18 हजार 827 मतांनी विजयी झाले.

देशात सर्वात मोठा आणि धक्कादायक निकाल लागला तो अमेठीतून. काँग्रेसचा आणि गांधी घराण्याचा मतदारसंघ अशीच ओळख असलेल्या या मतदारसंघातून 1980 ला संजय गांधी खासदार होते. त्यांच्यानंतर राजीव गांधी 1991 पर्यंत निवडून आले. तर 1991 ते 1998 या काळात काँग्रेसचे खासदार सतीश शर्मा निवडून आले. त्यानंतर सोनिया गांधी या मतदार संघातून खासदार होत्या. त्यानंतर 2014 ला राहुल गांधी खासदार झाले. मात्र, यंदा त्यांना पराभव पत्करावा लागला.

Loading...

जम्मू काश्मीरमध्ये पीडीपी प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री महबूबा मुफ्ती यांना दणका बसला. इतं नॅशल कॉन्फरन्सचे उमेदवार हनैन मसूदी यांनी बाजी मारली. मुफ्तींचे वडील मुफ्ती मोहम्मद सईद हेदेखील खासदार होते.

 धौरहा लोकसभा मतदारसंघात माजी केंद्रीय मंत्री जितिन प्रसाद यांना पराभव पतकरावा लागला. त्यांच्या वडीलांनीही राजकारणात महत्त्वाची भूमिका बजावली होती.

दक्षिण मुंबईतून शिवसेलेच्या अरविंद सावंत यांनी काँग्रेसचे मिलिंद देवरा यांना पराभूत केलं. त्यांचे वडील मुरली देवरा हे चारवेळा खासदार होते.

माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांचा मुलगा अजित सिंह यांनाही पराभवाचा धक्का बसला. मुजफ्फरनगर इथून चौधरी चरण सिंह यांनाही पराभव पत्करावा लागला होता.

बागपत येथून सत्यपाल सिंह यांनी जयंत चौधरी यांना पराभूत केलं. जयंत चौधरींचे वडील अजीत सिंह आणि आजोबा चरण सिंह खासदार होते.

मोदी लाटेत महाराष्ट्रात राष्ट्रावादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांचे नातू माजी उप मुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांचा पराभव झाला.

हरियाणाच्या रोहतकमध्ये भाजप उमेदवार अरविंद शर्मा यांनी काँग्रेसच्या दीपेंद्र हुड्डा यांना पराभूत केलं. हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपेंद्र हुड्डा यांच्या घराणेशाहीला जनतेनं नाकारलं.

हरियाणात दुष्यंत चौटाला यांनाही पराभव पत्करावा लागला. त्यांचे वडील अजय चौटाला खासदार आणि आमदार होते तर आजोबा ओम प्रकाश चौटाला हरियाणाचे मुख्यमंत्री होते.

समाजवादी पक्षातून बाहेर पडलेल्या शिवपाल यादव यांचा पराभव झाला. त्यांना दुसऱ्या क्रमांकावरही स्थान मिळालं नाही.

ओडिसाचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांची मुलगी अंजली सोरेन यांना पराभव पत्करावा लागला. भाजपच्या विश्वेश्वर तुडु यांनी मयूरभंज मतदारसंघातून विजय मिळवला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 24, 2019 10:28 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...