'युपीए'च्या काळात राहुल गांधींनी मंत्रिमंडळात यायला पाहिजे होतं - मिलिंद देवरा

'युपीए'च्या काळात राहुल गांधींनी मंत्रिमंडळात यायला पाहिजे होतं - मिलिंद देवरा

'आमचं सरकार असताना आम्ही जास्त सरकारवर लक्ष केंद्रीत केला होतं तर मोदी सरकारचा जास्त वेळ जाहीरातबाजीवरच खर्च होतो.'

  • Share this:

मुंबई 19 एप्रिल : 'युपीए'चं सरकार असताना राहुल गांधी यांनी मंत्रिमंडळात यायला पाहिजे होतं असं मत मुंबईचे काँग्रेसचे अध्यक्ष मिलिंद देवरा यांनी व्यक्त केलं. देवरा हे दक्षिण मुंबईतून काँग्रेसचे उमेदवारही आहेत. 'युपीए' काळात झालेल्या चुकांपासून आम्ही खूप शिकलो आहेत असंही ते म्हणाले. CNNnews18 च्या Viewpoint या कार्यक्रमात ते बोलत होते. युपीएचं सरकार असताना आमची कामं लोकांपर्यंत घेऊन जाण्यास आम्ही कमी पडलो अशी कबूलीही त्यांनी दिली.

मनमोहनसिंग पंतप्रधान असताना राहुल गांधी यांनी सरकारमध्ये सहभागी व्हायला पाहिजे होतं का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला होता. त्यावर उत्तर देताना देवरा म्हणाले, राहुल सरकारमध्ये आले असते तरीही दोन सत्ता केंद्र तयार झालीत असे आरोप झाले असते. पण त्यांनी सरकारमध्ये सहभागी व्हायला हवं होतं असं वाटतं.

आमचं सरकार असताना आम्ही जास्त सरकारवर लक्ष केंद्रीत केला होतं तर मोदी सरकारचा जास्त वेळ जाहीरातबाजीवरच खर्च होतो अशी टीकाही त्यांनी केली. भाजपने काँग्रेसची भ्रष्टाचारी अशी प्रतिमा बनवली आहे. मात्र वस्तुस्थिती अशी नाही. ज्या 2G प्रकरणाच्या भ्रष्टाचाराचं प्रकरण देशभर गाजलं होतं. ते प्रकरणच कोर्टात टिकलं नाही. मात्र काँग्रेसची प्रतिमा खराब करण्याची भाजपची खेळी यशस्वी ठरली असंही ते म्हणाले.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेस अतिशय चांगली कामगिरी करेल अशी आशाही त्यांनी व्यक्त केली. महाराष्ट्रात काँग्रेसमध्ये मतभेद नाहीत. काही त्रुटी असल्यात तर त्या आम्ही दूर करू असंही ते म्हणाले. निवडणुकीच्या आधी महिनाभर मुंबई काँग्रेसचं अध्यक्षपद मिळालं त्यामुळे निवडणुकीनंतर पक्ष मजबूत करण्यासाठी खास प्रयत्न करणार असल्याचंही ते म्हणाले. माझं राजकारण हे मुंबई पुरतं मर्यादीत असून त्याच्या बाहेर मला जायचं नाही असंही देवरा यांनी सांगितलं.

First published: April 19, 2019, 11:17 PM IST

ताज्या बातम्या