मी योग्यच बोललो होतो, नरेंद्र मोदी नीच आहेत- मणिशंकर अय्यर

मी योग्यच बोललो होतो, नरेंद्र मोदी नीच आहेत- मणिशंकर अय्यर

मणिशंकर अय्यर यांनी मोदींना नीच म्हटल्याचं योग्य आहे असं वादग्रस्त विधान पुन्हा केलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 14 मे : काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केलं आहे. नरेंद्र मोदी यांना नीच बोलल्याचं योग्य होतं असं मणिशंकर अय्यर यांनी म्हटलं आहे. त्यामुळे आता मोठा वाद निर्माण झाला आहे. लोकसभा निवडणुकीच्या सहा टप्प्यातील मतदान पार पडलं असून 19 मे रोजी शेवटच्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. त्यामुळे आता शेवटच्या टप्प्यात अय्यर यांनी केलेल्या विधानावरून पुन्हा एकदा आरोप – प्रत्यारोप रंगणार हे नक्की! यापूर्वी देखील मणिशंकर अय्यर यांंनी नरेंद्र मोदींबद्दल नीच शब्द वापरल्यानं मोठा वाद निर्माण झाला होता.

पाकिस्तानच्या बलुचिस्तानमध्ये भाजपचे झेंडे फडकावले गेले? काय आहे सत्य

काय बोलले होते मणिशंकर अय्यर

डिसेंबर 2017मध्ये गुजरात विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसचे नेते मणिशंकर अय्यर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर ''नीच माणूस, गंदी नाली का किडा,'' अशी टीका केली होती. त्याचा भाजपनं निवडणुकीच्या प्रचारामध्ये पुरेपूर उपयोग केला होता. मणिशंकर अय्यर यांच्या या विधानामुळे राहुल गांधी यांनी त्यांना तात्काळ पंतप्रधानांची जाहीर माफी मागण्याचे आदेश दिले होते. पण मणिशंकर यांनी माफी मागतानाही जर तर शब्दांचा प्रयोग केल्याने संतापलेल्या राहुल गांधी यांनी मणिशंकर यांची थेट पक्षातूनच हकालपट्टी केली होती.

मोदींना म्हटलं होतं चायवाला

मणिशंकर अय्यर यांनी 2014च्या लोकसभा निवडणुकीत नरेंद्र मोदी यांना 'चहावाला' म्हणून हिनवल्याने काँग्रेसला पराभूत व्हावं लागलं होतं. तरीही मणिशंकर अय्यर यांनी गुजरात निवडणुकीत पुन्हा तीच चूक करत पंतप्रधानांना खालच्या भाषेत लक्ष केलं होतं. त्याचा देखील भाजपला फायदा झाला होता.


VIDEO: निवडणूक आयोगानं अशा लोकांची तोंड बंद करावीत- संजय राऊत

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 14, 2019 11:54 AM IST

ताज्या बातम्या