ममता दीदींनी 24 तासातच बदला घेतला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

ममता दीदींनी 24 तासातच बदला घेतला, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्लाबोल

'ममता बॅनर्जी यांची सत्ता आता संपणार आहे. ममतांच्या जुलमी राजवटीपासून इथल्या लोकांची सुटका होणार आहे.'

  • Share this:

बशिरहाट (प.बंगाल) 15 मे : पश्चिम बंगालमध्ये भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये सुरू झालेली लढाई शांत होण्याची चिन्हे नाहीत. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोड शो नंतर वातावरण तापलेलं असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी 15 मे बशिरहाट इथं जाहीर सभा घेऊन मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. दीदींनी घोषणा केल्याप्रमाणे 24 तासातच बदला घेतला असा आरोप त्यांनी केला.

पंतप्रधान मोदी म्हणाले, इंच इंचाचा बदला घेऊ अशी घोषणा ममता बॅनर्जी यांनी केली होती. अमित शहा यांच्या रोड शोवर हल्ला करून त्यांनी बदला घेतला आणि 24 तासात आपली घोषणा खरी करून दाखवली असा आरोपही त्यांनी केला.

ममता बॅनर्जी यांची सत्ता आता संपणार आहे. ममतांच्या जुलमी राजवटीपासून इथल्या लोकांची सुटका होणार आहे. 23 तारखेची वाट पाहा, लोकांचा निर्णय तुम्हाला कळेल असंही ते म्हणाले. सर्वच राजकीय सर्व्हेमध्ये भाजपची सत्ता येणार असं सांगितलं जात आहे. दीदींच्या राजकारणामुळे आता भाजपला 300 पेक्षा जास्त जागा मिळतील असंही त्यांनी स्पष्ट केलं.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या वक्तव्याने नव्या वादाची ठिणगी पडण्याची शक्यता आहे. ममता बॅनर्जी यांना पश्चिम बंगालचं 'बगदीदी' बनायचं आहे असा गंभीर आरोप उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केलाय.

भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या रोडशोवरून मंगळवारी कोलकात्यात राडा झाला होता. त्यावरून योगी आदित्यनाथ यांनी ममता बॅनर्जी यांच्यावर कठोर शब्दात टीका केलीय.

इस्लामीक स्टेटचा प्रमुख बगदादी यांच्या प्रभावाने तुम्हाला बंगालचा बगदीदी व्हायचं आहे का असा सवालही त्यांनी विचारला आहे. बंगालमध्ये लोकशाहीची हत्या होत असल्याचा आरोपही त्यांनी केला. बंगाल हा भारताचा अविभाज्य भाग आहे. त्याला आम्ही मुख्य प्रवाहापासून तोडू देणार नाही असंही योगी आदित्यनाथ यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

First published: May 15, 2019, 5:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading