ममतांना धक्का, 50 नगरसेवकांसह 4 आमदार भाजपमध्ये जाणार?

ममतांना धक्का, 50 नगरसेवकांसह 4 आमदार भाजपमध्ये  जाणार?

पश्चिम बंगालमध्ये मिशन 2021, लोकसभा निवडणुकीतील पराभवाच्या धक्क्यातून सावरण्याआधीच ममतांना धक्का.

  • Share this:

कोलकाता, 28 मे : लोकसभा निवडणुकीत पराभवानंतर पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जींच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. तृणमूलने निलंबित केलेल्या मुकुल रॉय यांनी काही आमदार भाजपच्या संपर्कात असल्याचा दावा केला आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार 50 पेक्षा अधिक नगरसेवक भाजपमध्ये येणार आहेत. यात 4 आमदारांचा समावेश असल्याचंही म्हटलं जात आहे.

तृणमूलच्या बंडखोर आमदारांमध्ये मुकुल रॉय यांचा मुलगा आणि आमदार शुभ्रांशु रॉय यांचाही समावेश आहे. फक्त शुभ्राशुच नाही तर मुकुल रॉय यांनीही 2018 मध्ये भाजपचा झेंडा हातात घेतला होता. आता त्यांच्या पाठोपाठ मुलगासुद्धा भाजपमध्ये जात आहे.

एका नेत्यानं म्हटलं की आम्ही ममता बॅनर्जींवर नाराज नाही. पण निवडणुकीतील भाजपच्या प्रचंड विजयाने आम्हाला प्रेरणा मिळाली. लोक भाजपला प्राधान्य देत आहेत कारण हा पक्ष लोकांसाठी काम करत आहेत.

पश्चिम बंगालंध्ये 2021 ला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीवर भाजपचे लक्ष आहे. लोकसभा निवडणुकीत भाजपने बंगालमध्ये 42 पैकी 18 जागा जिंकल्या तर ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसला 22 जागांवर समाधान मानावं लागलं. 2014 पेक्षा 12 जागा तृणमूलला कमी मिळाल्या. भाजपने गेल्या निवडणुकीत फक्त 2 जागा मिळवल्या होत्या. त्यांनी मुसंडी मारत ममतांच्या साम्राज्याला सुरुंग लावला. निवडणूक प्रचारादरम्यान मोदी विरुद्ध ममता बॅनर्जी यांच्यात जोरदार खडाजंगी सुरू होती. आता निवडणुकीचा निकाल आल्यानंतर जिव्हारी लागलेल्या पराभवाची जबाबदारी घेत ममता बॅनर्जींनी राजीनाम्याचा प्रस्ताव ठेवला आहे.

बंगाली राजकारणात ऐतिहासिक ठरू शकेल अशी 2019 ची लोकसभेची निवडणूक या राज्याबरोबर देशाचा कौलही ठरवेल असं म्हटलं जात होतं. बंगाली जनतेवर अनेक वर्षं राज्य करणारी डावी आघाडी उलथून टाकत ममता बॅनर्जींनी या राज्यावर चांगला जम बसवला असतानाच आता भाजपच्या वारूने बंगालमध्ये प्रवेश केला. भाजप आणि तृणमूल काँग्रेस दोन्ही पक्ष या निवडणुकीत आधी नव्हते एवढे आक्रमक झालेले दिसले. ममता विरुद्ध मोदी असा सामना पश्चिम बंगालमध्ये रंगला.

SPECIAL REPORT : रॅगिंगला आणखी किती विद्यार्थी बळी पडणार?

First published: May 28, 2019, 3:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading