किरण खेर चंदीगड नाही तर या ठिकाणाहून लढणार?

किरण खेर चंदीगड नाही तर या ठिकाणाहून लढणार?

किरण खेर यांच्या मतदारसंघ बदलणार अशी चर्चा सध्या जोरात सुरू आहे.

  • Share this:

चंदीगड, 16 एप्रिल :  लोकसभा निवडणुकांसाठी भाजप अत्यंत काटोकोर नियोजन करताना दिसत आहे. लोकसभेच्या प्रत्येक जागेवर भाजपनं आता आपलं लक्ष केंद्रीत केलं आहे. त्याचाच एक भाग म्हणून चंडीगड मतदारसंघातील विद्यमान खासदार किरण खेर यांचा मतदारसंघ बदलण्याचा विचार सध्या भाजप करत असल्याची चर्चा आहे. किरण खेर यांना चंदीगड ऐवजी अमृतसर येथून उमेदवारी दिली जावू शकते. एक – दोन दिवसात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.

या ठिकाणचा उमेदवार बदलणार?

किरण खेर यांच्यासह हरदीप सिंह पुरी आणि राजिंदर मोहन छीना यांचा मतदारसंघ देखील बदलला जाणार अशी चर्चा आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार चंदीगडमधून संजय टंडन आणि सत्यपाल जैन यापैकी एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते. तर, होशिरपूरमधून विजय सांपला, सोमप्रकाश यांचं नाव चर्चेत आहे. तर, गुरूदासपूरमधून खन्ना परिवारातून एकाला उमेदवारी दिली जाऊ शकते. पण, खन्ना परिवाराव्यतिरिक्त गुरूदासपूरमधून नरिंदर परमार याचं नाव देखील चर्चेत आहे.

चंदीगडमध्ये भाजपचं संघटन मजबूत आहे. त्यामुळे उमेदवार कुणीही असल्यास भाजप सहज जिंकेल. पण, सेलिब्रेटी म्हणून किरण खेर गुरूदासपूर किंवा अमृतसरमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यास त्याचा फायदा भाजपला होईल असा भाजपचा अंदाज आहे. त्याचा परिणाम हा जागा वाढण्यावर होईल. त्यामुळे पंजाबमधील 13 पैकी जास्त जागा जिंकण्यावर भाजपचा भर आहे.

VIDEO : मुंडे भगिनींबद्दल संभाजीराजे म्हणतात...

First published: April 16, 2019, 7:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading