मोदी-शहा जोडी फ्लॉप, या राज्यात काँग्रेसचे 19 खासदार!

मोदी-शहा जोडी फ्लॉप, या राज्यात काँग्रेसचे 19 खासदार!

देशात असे एकमेवर राज्य आहे जेथे भाजपचा भगवा झेंडा फडकला नाही.

  • Share this:

तिरुवनंतपूरम, 24 मे: लोकसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाले आहेत. देशात पुन्हा एकदा स्पष्ट बहुमत असलेले मोदी सरकार सत्तेत येणार. या निवडणुकीत भाजपने अनेक राज्य काँग्रेस मुक्त केली. पण देशात असे एकमेवर राज्य आहे जेथे भाजपचा भगवा झेंडा फडकला नाही. तर ज्या काँग्रेसला संपूर्ण देशाने नाकारले त्यांना या राज्यांना मोठा विजय मिळून दिला. लोकसभेच्या 20 जागा असलेल्या केरळमध्ये काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळाल्या. तर भाजपला यंदा देखील एकही जागा जिंकता आली नाही.

केरळमधील विजयासाठी यंदा भाजपने मोठा जोर लावला होता. पण त्यांना एकाही जागेवर विजय मिळवता आला नाही. याउलट काँग्रेस नेतृत्वाखालील UDFला 19 जागांवर विजय मिळाला. यातील 15 जागा काँग्रेसच्या आहेत. डाव्या आघाडीला केवळ एकच जागा मिळाली. भाजपने तिरुवनंतपूरम, त्रिशूर आणि पटन्मथिट्टा या 3 मतदारसंघात विजयासाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली होती. विशेषत: तिरुवनंतपूरमध्ये शशी थरुर यांच्याविरुद्ध भाजपला विजयाची अपेक्षा होती. गेल्या निवडणुकीत थरुर यांचा केवळ 15 हजार मतांनी विजय झाला होता. त्यामुळे यावेळी त्यांना विजयाची आशा होती. पण थरुर यांनी मोदी त्सुनामीत 99 हजार मतांनी विजय मिळवला.

केरळमध्ये भाजपला समाधान देणारी बाब म्हणजे 2014पेक्षा 2019मध्ये त्यांना मिळालेली मते वाढली आहेत. 2014मध्ये भाजपला 10.33 टक्के मते मिळाली होती. यावेळी त्यात वाढ होत ती 12.93 टक्के मते मिळाली आहेत.

लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला केवळ 54 जागा मिळाल्या आहेत. यातील सर्वाधिक खासदार केरळमधून आहेत. काँग्रेसला 15 जागा मिळाल्या असून काँग्रेस आघाडीचे 19 खासदार आहेत.

First published: May 24, 2019, 2:07 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading