...तर मुस्लिमांनी भाजपला साथ द्यावी, काँग्रेसच्या नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

...तर मुस्लिमांनी भाजपला साथ द्यावी, काँग्रेसच्या नेत्याचं धक्कादायक वक्तव्य

'या आधी प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम आणि ख्रिश्चन उमेदवारांना तिकिटं दिली जात असत या वेळी मात्र फक्त एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं.'

  • Share this:

बंगळुरू 21 मे : Exit Pollच्या निकालानंतर सर्वच विरोधी पक्षांमधली अस्वस्थता वाढली आहे. कर्नाटक काँग्रेसमध्ये तर फुट पडण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रोशन बेग यांनी पक्षाविरुद्ध उघड उघड बंड पुकारलंय. देशात पुन्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार असतील तर मुस्लिमांनी भाजपला साथ द्यावी असं धक्कादाय मत बेग यांनी व्यक्त केलं. लोकसभा निवडणुकीत काँग्रेसने अल्पसंख्याकांना तिकीटं दिली नाहीत असंही ते म्हणाले.

विधानसभेतली सत्ता गेल्याने कर्नाटक काँग्रेसमध्ये असंतोष आहे. त्यातच केंद्रातही पुन्हा भाजपची सत्ता येणार असल्याने नेत्यांमध्ये असंतोष निर्माण झालाय. लोकसभा निवडणुकीत मुस्लिमांना तिकीटं दिलं नाही असा आरोप करत राज्यातले काँग्रेसचे नेते रोशन बेग यांनी पक्ष नेतृत्वावर टीकेची झोड उठवलीय.

या आधी प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम आणि ख्रिश्चन उमेदवारांना तिकिटं दिली जात असत या वेळी मात्र फक्त एका मुस्लिम उमेदवाराला तिकीट दिलं. गरज पडली तर काँग्रेस सोडण्याचाही विचार करेल असंही ते म्हणाले. पक्षाची तिकिटं ही विकण्यात आली आहेत असा आरोप त्यांनी केला. कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष गुंडूराव हे बिनकामाचे आहेत. मुख्यमंत्री कुमारस्वामी हे काम करत नाहीत असं यांच्याविरुद्ध ओरडून अर्थ नाही असंही त्यांनी सुनावलं.

सिद्धरामय्या यांनाच पहिल्या दिवसांपासून मुख्यमंत्री करायला पाहिजे होतं असं मतही त्यांनी व्यक्त केलं. रोशन बेग यांच्या या वक्तव्यामुळे पक्षात खळबळ उडाली आहे. बेग यांच्या मतावर पक्षात योग्य स्तरावर चर्चा होईल. ते पक्षाचे ज्येष्ठ नेते आहेत अशी प्रतिक्रिया काँग्रेसचे प्रवक्ते राजीव शुक्ला यांनी व्यक्त केलीय.

First published: May 21, 2019, 3:10 PM IST

ताज्या बातम्या