माझ्या मुलानं काम न केल्यास त्याचे कपडे फाडा – कमलनाथ

माझ्या मुलानं काम न केल्यास त्याचे कपडे  फाडा – कमलनाथ

माझ्या मुलानं काम न केल्यास त्याचे कपडे फाडा असं मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी म्हटलं आहे.

  • Share this:

भोपाळ, 21 एप्रिल : लोकसभा निवडणुकीकरता जोरात प्रचार सुरू आहे. आश्नासनांची देखील खैरात केली जात आहे. दरम्यान, मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांनी केलेल्या विधानामुळे हा प्रचाराचा नेमका फंडा कोणता? असा प्रश्न सर्वांना पडला आहे. कारण, कमलनाथ यांचा मुलगा नकुल देखील लोकसभेच्या मैदानात आहे. नकुल छिंदवाडा या लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. नकुलचा प्रचार करताना कमलनाथ यांनी ‘ मी माझ्या मुलाला तुमची सेवा करण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरवलं आहे. त्याला तुम्ही सेवेची संधी द्याल. आज मी जो आहे तो तुमच्यामुळे. आता नकुल या ठिकाणी प्रचारासाठी नाही. पण, एक खात्री देतो तो तुमची नक्की काळजी घेईल. शिवाय, तुम्ही त्याला काम दिलात. त्यानंतर देखील त्यानं ते काम केलं नाही तर, त्याचे कपडे फाडा असं म्हटलं आहे. सध्या मध्य प्रदेशमध्ये कमलनाथ यांच्या विधानाची जोरात चर्चा सुरू आहे.

काळे झेंडे दाखवले म्हणून कन्हैया कुमार समर्थकांनी पळवून पळवून मारलं

छिंदवाडा आणि कमलनाथ

दरम्यान, छिंदवाडा आणि कमलनाथ यांचा जुना संबंध आहे. कारण याच ठिकाणाहून कमलमाथ नऊ वेळा खासदार म्हणून निवडून गेले आहेत. त्यानंतर त्यांनी मुख्यमंत्रीपदाकरता छिंदवाडामधून विधानसभेची पोटनिवडणूक लढवली. दरम्यान, कमलनाथ यांनी यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर जोरदार टीका केली. नरेंद्र मोदी यांनी 2014मध्ये दिलेली वचनं पाळली नाहीत असा आरोप देखील कमलनाथ यांनी केला.

VIDEO : पवारांचा असेल बालेकिल्ला, आठवलेंची अशीही कविता

First published: April 21, 2019, 8:31 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading