लखनऊ, 20 एप्रिल : आझम खान यांनी जयाप्रदा यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. दरम्यान, जयाप्रदा आणि आझम खान यांच्यामध्ये सध्या जोरात वाकयुद्ध रंगलं आहे. जयाप्रदा यांनी रामपूरमधून उमेदवारी अर्ज भरत आझम खान यांना आव्हान दिलं आहे. दरम्यान, जयाप्रदा यांनी आता मायावती यांना सल्ला दिला आहे. 'माझ्या कपड्यांवर बोलणाऱ्या आझम खान यांचे डोळे एक्स रे सारखे आहेत. ते तुमच्यावर कुठे कुठे नजर मारतील हे मला माहित नाही'. असा सल्ला जयाप्रदा यांनी मायावती यांना दिला आहे. त्यामुळे दोघांमध्ये सुरू असलेला वाद अद्यापही संपलेला नाही हे स्पष्ट होत आहे.
शिवाय, 'आझम खान माझ्यावर टिपण्णी करतात. माझ्यावर टीका करतात. माझे अश्लील फोटो व्हायरल केले जातात. त्यामुळे बसपा प्रमुख मायावती यांनी त्यांचा प्रचार करताना विचारपूर्वक करावा', असं जयाप्रदा यांनी म्हटलं आहे. काही दिवसांपूर्वी आझम खान यांनी जयाप्रदा यांच्या कपड्यावर वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. त्यावरून आझम खान यांच्यावर टीकेचा भडीमार झाला होता.
जयाप्रदा आणि आझम खान यांच्यात का आहे 36 चा आकडा?
जयाप्रदा आझम खान वाद
माजी खासदार आणि अभिनेत्री जयाप्रदा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला तेव्हाच त्या रामपूरमधून निवडणूक लढणार अशी चर्चा सुरू झाली होती. याच रामपूरमधून जयाप्रदा समाजवादी पक्षातर्फे लढल्या होत्या. पण ,तेव्हापासूनच आझम खान यांच्याशी त्यांचं शत्रुत्व होतं. आझम खान हे समाजवादी पक्षातर्फे रामपूरमधून निवडणूक लढवत आहेत. त्यामुळे जयाप्रदा आणि त्यांच्यातला संघर्ष तीव्रतेने उफाळून आला आहे. आझम खान आपली बदनामी करण्याची संधी सोडत नाहीत, असं जयाप्रदांचं म्हणणं आहे.
VIDEO: ...तर देशात निवडणुकीची गरजच काय?- उदयनराजे