9 वर्षाच्या नाराजीनंतर जगनमोहन रेड्डींचा काँग्रेसपुढं मैत्रीचा हात

आंध्रप्रदेशातील वायएसआर काँग्रेस आणि काँग्रेसमधील वादावर आता पडदा पडणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 7, 2019 10:23 AM IST

9 वर्षाच्या नाराजीनंतर जगनमोहन रेड्डींचा काँग्रेसपुढं मैत्रीचा हात

हैदराबाद, 07 एप्रिल : काँग्रेस आणि वायएसआर काँग्रेसमधील वाद काही नवीन नाही. दोन्ही पक्षांमध्ये तब्बल 9 वर्षे वाद होता. त्यामुळे आंध्र प्रदेशातील राजकीय वातवरण ढवळून निघालं होतं. पण, सारे वाद बाजुला सारून, मतभेद विसरून आता वायएसआर काँग्रेस प्रमुख जगनमोहन रेड्डी यांनी काँग्रेससमोर मैत्रीचा हात पुढं केला आहे. याबाबत बोलताना त्यांनी मी काँग्रेसला माफ करत असल्याची घोषणा केली. त्यामुळे निवडणुकांसाठी काँग्रेस आणि वायएसआर काँग्रेस एकत्र येणार का? याबाबतची चर्चा सुरू झाली आहे. 2011पासून काँग्रेस आणि वायएसआर काँग्रेसमधील वादांची मालिका सुरू होती. पण, त्यावर आता पडदा पडणार असल्याचं सुतोवाच जगनमोहन रेड्डी यांनी केलं आहे.

जगनमोहन रेड्डी यांनी 2011मध्ये लोकसभेच्या पोटनिवडणुकीमध्ये 5.45 लाखांच्या मतांनी विजय मिळवला होता. त्यानंतर त्यांना बेनामी संपत्ती प्रकरणामध्ये अटक देखील करण्यात आली होती. जवळपास 16 महिन्यांच्या तुरूंगवासानंतर सप्टेंबर 2013मध्ये त्यांची सुटका झाली होती. जेलमधून बाहेर आल्यानंतर पक्ष बांधणीवर जगनमोहन रेड्डी यांनी लक्ष केंद्रीत केलं होतं. 2014च्या विधानसभा निवडणुकीमध्ये वायएसआर काँग्रेसनं 175 पैकी 67 जागी विजय मिळवला होता. तर, लोकसभेत 8 खासदार निवडून आले होते. सध्या जगनमोहन रेड्डी यांनी टीडीपीविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. टीडीपी काँग्रेससोबत मिळून भाजपविरोधी मोर्चात सहभागी झाली आहे. त्यामुळे आता टीडीपीसोबत देखील जगनमोहन रेड्डी जुळून घेणार का? अशी चर्चा रंगली आहे.


TDP, रेड्डी वाद

टीडीपी एनडीएचा घटक पक्ष होता. पण, आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मुद्यावरून टीडीपीनं एनडीएची साथ सोडली. शिवाय, टीडीपीनं सरकारविरोधात अविश्वासदर्श ठराव देखील मांडला होता. चंद्रबाबु नायडू आणि जगनमोहन रेड्डी यांच्यातील वाद देखील सर्वश्रुत आहे. पण, आता रेड्डी यांनी काँग्रेसकडे मैत्रिचा हात पुढं केल्यानं आंध्रप्रदेशातील राजकीय समीकरणं बदलली आहेत.

Loading...


VIDEO: नवज्योत सिंग सिद्धू यांच्या समोर भाविकांनी दिल्या 'मोदी-मोदी'च्या घोषणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 7, 2019 09:56 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...