News18 Lokmat

VIDEO 'देशाला चौकीदार नाही तर प्रामाणिक पंतप्रधान पाहिजे'

'नरेंद्र मोदींची 2014सारखी लाट नसली तरी मोदी हाच सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे.'

News18 Lokmat | Updated On: May 3, 2019 11:52 PM IST

VIDEO 'देशाला चौकीदार नाही तर प्रामाणिक पंतप्रधान पाहिजे'

नवी दिल्ली 03 मे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पर्याय कोण आहे? असा प्रश्न कायम विचारला जातोय. मोदींना अनेक पर्याय आहेत. देशाला चौकीदार नाहीतर प्रामाणिक पंतप्रधान पाहिजे असं मत काँग्रेसचे नेते गौरव वल्लभ यांनी व्यक्त केलंय. 'सीएनबीसी आवाज'च्या 'चुनाव अड्डा' कार्यक्रमात बोलतांना त्यांनी हे मत व्यक्त केलं.लोकसभा निवडणुकीचे चार टप्पे पूर्ण झाले असून तीन टप्प्यांचं मतदान राहिलं आहे. या सर्व टप्प्यांमध्ये नरेंद्र मोदींची 2014सारखी लाट नसली तरी मोदी हाच सर्वात महत्त्वाचा फॅक्टर आहे असं मत व्यक्त करण्यात येतंय. आज सर्व प्रचार हा एकाच व्यक्तीच्या भोवती फिरत आहे आणि ती व्यक्ती म्हणजे नरेंद्र मोदी असल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार शेषनाराणय सिंह यांनी व्यक्त केलं.


Loading...


निवडणुकीत आत्मविश्वास हा नेत्यांना दाखवावाच लागतो. वस्तुस्थिती वेगळी असली तरी कार्यकर्त्यांचं मनोबल उंचावण्यासाठी असा आत्मविश्वास आवश्यक असतो. काँग्रेसने कमजोर उमेदार दिले या प्रियंका गांधी यांच्या वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशात काँग्रेसला नुकसान होऊ शकते असं मत ज्येष्ठ पत्रकार अलोक मेहेता यांनी व्यक्त केलं.उत्तर प्रदेशात, मध्यप्रदेश, पंजाब या राज्यांमध्ये भाजपला 2014 सारखं यश मिळणार नाही मात्र बिहार, हरियाणा, महाराष्ट्र या राज्यांमध्ये भाजपची स्थिती पूर्वीसारखीच राहू शकते असं मत CSDSचे संचालक संजय कुमार यांनी व्यक्त केलं.निवडणुकीचा प्रचार सुरु झाल्यावरच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जात का आठवते असा सवाल काँग्रेसने केला आहे. गेली  पाच वर्ष मोदींना जातीची कधी आठवण आली नाही मात्र केवळ मतं मागण्यासाठी त्यांनी आपल्या जातीची प्रचारात आठवण काढली अशी टीकाही काँग्रेसने केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

Tags:
First Published: May 3, 2019 11:23 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...