VIDEO 'मुलासाठी मत मागणार्या बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकवा'
मावळ लोकसभेच्या निवडणुकीसाठी अजित पवार हे पार्थ पवार यांच्या प्रचारासाठी सध्या मावळ तालुक्यातील प्रत्येक कानाकोपरा पिंजून काढत आहेत पार्थ पवार यांना निवडून आणण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंबीय मावळ तालुक्यात ठाण मांडून आहेत. शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचाराचा आज नारळ आज फुटला. यावेळी बोलताना मंत्री विजय शिवतारे म्हणाले, पवना जलवाहिनी गोळीबार प्रकरणात मृत्युमुखी पडलेल्या हुतात्म्यांना जर खरी श्रद्धांजली द्यायची असेल तर बारामतीच्या जनरल डायरला धडा शिकवण्याची वेळ आली आहे. ऐका काय म्हणाले शिवतारे.
पुण्यात रंगणार सामना, काँग्रेसकडून सुरेखा पुणेकर रिंगणात?
पुण्यातल्या उमेदवारीवरून काँग्रेसचा घोळ अजुनही संपेणा. अनेक नावांची चर्चा झाल्यानंतर शुक्रवारी नवेच नाव समोर आले. लावणी सम्राज्ञी सुरेखा पुणेकर यांना काँग्रेस उमेदवारी देण्याची शक्यता आहे. खुद्द रेखा पुणेकर यांनीच तसे संकेत दिले आहेत त्यामुळे पुण्यात गिरीश बापट विरुद्ध सुरेखा पुणेकर यांच्यात सामना रंगणार अशी शक्यता आहे.नटरंगी नार रिंगणात.
BREAKING : पक्षाने आदेश दिला तर नरेंद्र मोदींविरुद्ध लढणार - प्रियांका गांधी
अयोध्या: काँग्रेसने आदेश दिला तर मी वाराणसीतून नरेंद्र मोदींविरुद्ध लढायला तयार आहे, असं काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांनी म्हटलं आहे. प्रियांका गांधींनी अयोध्येत पंतप्रधान मोदींवर जोरदार हल्ला चढवला. पाकिस्तानमध्ये बिर्याणी खायला कोण गेलं होतं, असा सवालही त्यांनी विचारला. सविस्तर बातमी वाचा
प्रियांका गांधींचा थेट अयोध्येतून मोदींवर हल्लाबोल; काय म्हणाल्या पाहा VIDEO
अयोध्या येथील प्रचार सभेत बोलताना प्रियांका गांधी म्हणाल्या की, ''पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण जग पालथं घातलं. सगळ्या देशात फिरले पण त्यांच्या वाराणशी मतदार संघात कधी ते फिरकलेच नाहीत,'' असं प्रियांका गांधी म्हणाल्या. यावेळी त्यांनी मोदींवर चौफेर टीका केली. काय म्हणाल्या प्रियंका
उत्तर मुंबई : उर्मिलाच्या राजकीय अंदाजासमोर विरोधकही धास्तावले
मुंबई : काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांच्या पेहरावासह एकूणच देहबोलीतही बदल दिसून आला. काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीनं तिचं नाव जाहीर केलंय. तीन दिवसांपूर्वीच उर्मिलानं काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. उर्मिला मार्तोंडकरांशी Exclusive बातचीत
रावेरच्या बदल्यात पुणे राष्ट्रवादीकडे? प्रवीण गायकवाडांचं नाव पुन्हा चर्चेत
पुणे लोकसभा मतदारसंघातील आघाडीच्या उमेदवाराबाबत अजूनही सस्पेन्स कायम आहे. अशातच आता रावेरची जागा राष्ट्रवादीने काँग्रेसला सोडल्याने पुण्याची जागा आता काँग्रेसकडून राष्ट्रवादीला सोडली जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार दिल्लीत असून पुण्याची जागा राष्ट्रवादीला घेण्याबाबतच्या घडामोडींना वेग आला असल्याची माहिती आहे. असा झाला पुण्याचा घोळ
ताईंसाठी दादांची स्वारी हर्षवर्धन पाटील यांच्या दारी!
लोकसभा निवडणुकीचं मतदान जसं जवळ येत आहे तसं प्रचार आणि राजकीय समिकरणांची फेरजुळवणी होत आहे. बारामती मतदारसंघात कुठलीही कसर राहू नये यासाठी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी आपले राजकीय प्रतिस्पर्धी हर्षवर्धन पवार यांची त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. तुम्ही लोकसभेला मदत करा, आम्ही विधानसभेला मदत करू असं आश्वासन अजित पवारांनी पाटील यांना दिलं आहे. दादांची शिष्टाई
लोकसभा 2019: माढाचा तिढा सुटला, भाजपने 'या' उमेदवाराला दिली संधी
अखेर माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने आपली उमेदवारी जाहीर केली आहे. भाजपने रणजीत नाईक-निंबाळकर यांना माढातून उमेदवारी दिली आहे.माढातून कोणाला उमेदारी द्यायची यावरून गेल्या काही दिवासांपासून जोरदार चर्चा सुरु होती.भाजपने आज लोकसभेसाठीची नवी उमेदवारी जाहीर केली. यात माढासह अन्य 11 जागांवरील उमेदवारांच्या नावाचा समावेश होता. माढ्यात आता राष्ट्रवादीचे संजय शिंदे विरुद्ध रणजितसिंह नाईक-निंबाळकर असा सामना रंगणार आहे.सातारा काँग्रेस जिल्हाध्यक्ष असलेल्या रणजितसिंह यांनी काहीच दिवसांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला होता. असा सुटला पेच.
VIDEO: मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही - जयंत पाटील
'मुख्यमंत्र्यांना सत्ता सोडवत नाही. त्यामुळे न्यायालयानेत त्यांच्यावर ताशेरे ओढले आहेत. तुम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहात की, एका पक्षाचे? असे ताशेरे न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ओढले आहेत. दाभोळकर, पानसरे यांचे मारेकरी अद्याप सापडले नसल्यामुळेच न्यायालयाने मुख्यमंत्र्यांवर ताशेरे ओढले आहेत,'' असं जयंत पाटील म्हणाले. सांगली येथे पार पडलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ''न्यायालयाने ओढलेल्या या ताशेऱ्यावरून मुख्यमंत्र्यानी गृहखाते कसे सांभाळले हे समजून येतं. मुख्यमंत्र्यांनी कायदा सुव्यवस्था काशी सांभाळली याचं सर्टिकफिकेत न्यायालयाने दिलं आहे,'' असंही ते म्हणाले. जयंत पाटलांचा हल्लाबोल.
SPECIAL REPORT: भाजपचा युपीतला नारा.. 'अब की बार 74 पार
या निवडणुकीत सर्वात लक्षवेधी लढत होणार आहे उत्तर प्रदेशात. कारण 2014 मध्ये भाजपनं या राज्यातून तब्बल 71 जागा जिंकत विरोधकांना चारीमुंड्या चीत केलं होतं. आता मात्र भाजपला रोखण्यासाठी सपा-बसपाप्रणित महागठबंधननं कंबर कसली आहे. तर भाजपनं 2014 चा रेकॉर्ड तोडण्याचा निर्धार केला आहे. उत्तर प्रदेशचा लेखाजोखा स्पष्ट करणारा विशेष रिपोर्ट. बघा स्पेशल रिपोर्ट
हार्दिक पटेल निवडणूक लढू शकणार नाही? हे आहे कारण!
काँग्रेसचे नेते हार्दिक पटेल यांच्या निवडणूक लढण्याच्या शक्यतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गुजरात उच्च न्यायालयाने हार्दिक यांच्या विरुद्धच्या प्रकरणांवर स्थगिती देण्यास नकार दिल्याने त्याच्या समोर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. हार्दिकने काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यावर पक्षाने त्याला उमेदवार म्हणून घोषीतही केलं आहे. वाचा कोर्टाचा दणका