निवडणुकीच्या आजच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या 'एका क्लिक'वर

निवडणुकीच्या आजच्या सर्व महत्त्वाच्या बातम्या 'एका क्लिक'वर

  • Share this:

मोदींनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये - शरद पवार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या टीकेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज उत्तर दिलं. कोल्हापूर इथं झालेल्या प्रचार सभेत त्यांनी मोदींना खडे बोल सुनावले. नरेंद्र मोदींनी माझ्या कुटुंबाची चिंता करू नये असा सल्लाही त्यांनी मोदींना दिला. मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठ घालवली आहे असा आरोपही त्यांनी केला. वाचा काय म्हणाले पवार

VIDEO: 'देश पुन्हा काँग्रेस आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात घालायचा का?' उद्धव ठाकरे UNCUT

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर अनेक राजकीय स्फोट घडविणारी मुलाखत दिली. शंभर जाहीर सभांची ताकद असणारी ही मुलाखत म्हणजे 'सौ सोनार की आणि एक लोहार की'. जनतेच्या मनातील सर्वच प्रश्नांना उद्धव ठाकरेंनी या मुलाखतीत उत्तरे दिली. ''शिवसेना कधीच सत्तेसाठी लाचार झाली नाही. शिवसेना-भाजपची युती ही हिंदुत्वाची, देशाची गरज होती. देश पुन्हा काँग्रेस आणि भ्रष्टाचाऱ्यांच्या घशात घालायचा काय?''  असा कडक सवाल त्यांनी यावेळी टीकाकारांना केला. उद्धव ठकारेंचा हल्लाबोल

काँग्रेसच्या नेत्यांना देशद्रोह्यांचा पंतप्रधान व्हायचं का? - उद्धव ठाकरे

काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या जाहीरनाम्यावरुन उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसवर सडकून टीका केलीय. काँग्रेसला नेमके काय पाहिजे आहे? काँग्रेसच्या नेत्यांना देशभक्तांचा पंतप्रधान व्हायचं की देशद्रोह्यांचा असा सवाल उद्धव ठाकरे यांनी काँग्रेसला केला आहे. उद्धव ठाकरे वसई येथे प्रचारासाठी आले होते. त्यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी काँग्रेसवर सडकून टीका केली. उद्धव म्हणाले...

'....तर राजकारणातून संन्यास घेईन' - अजित पवार

मावळ गोळीबाराचे आरोप सिद्ध झाले तर मी राजकीय संन्यास घेईन, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी म्हटलं आहे. मावळ गोळीबाराचे आदेश देण्यामध्ये पवार कुटुंबीयांपैकी एकाचा सहभाग होता, असं पंतप्रधान नरेंद्र मोदींनी वर्ध्याच्या सभेत म्हटलं होतं. त्याला अजित पवार यांनी उत्तर दिलं. मी मोदींना आव्हान देणार नाही पण त्यांना ज्यांनी हे सांगितलं त्यांना माझं आव्हान आहे, असंही ते म्हणाले. माझ्यावर बिनबुडाचे आरोप करू नका, असा इशारा अजित पवार यांनी दिला. अजित पवार म्हणाले

काँग्रेसच्या दुर्दशेला पक्षातलेच नेते जबाबदार - विखे पाटील

राज्यातल्या काँग्रेसच्या परिस्थितीला पक्षातलेच नेते जबाबदार आहेत. पक्षात कुरघोडीचं राजकारण असतं अशी कबूली विरोधीपक्ष नेते आणि राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली. न्यूज18 लोकमतच्या 'न्यूजरुम चर्चा' या कार्यक्रमात ते बोलत होते. राष्ट्रवादीने एक जागा सोडली असती तर अशी परिस्थिती निर्माण झाली नसती असं मतही त्यांनी व्यक्त केलं. विखेंची खंत

VIDEO : 'माझा मुलगा 24-25 वर्षांचा नाही, त्याला भाषणही करता येतं', विखेंचा पवारांना टोला

'माझा मुलगा 24-25 वर्षांचा नाही, त्याला भाषणही करता येतं,' असं म्हणत काँग्रेस नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांचे सुपुत्र पार्थ पवार यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. कारण पार्थ पवार हे आपल्या पहिल्या भाषणात काहीसे अडखळले होते. तसंच यानंतर सोशल मीडियावर त्यांना ट्रोलही करण्यात आलं होतं. तसंच गेल्या काही दिवसांत विखे-पवारांमध्ये झालेला संघर्षही राधाकृष्ण विखे-पाटील यांच्या या वक्तव्याचं एक कारण असू शकतं. ऐका काय म्हणाले विखे पाटील

VIDEO : 'नवरा बदलण्याइतकं संविधान बदलणं सोप नाही', स्मृती इराणींबद्दल वादग्रस्त वक्तव्य

नवरा बदलण्याइतकं संविधान बदलणं सोप नाही,' असं वादग्रस्त वक्तव्य रिपब्लिकन नेते जयदीप कवाडे यांनी केलं आहे. जयदीप कवाडे यांच्या विधानाचा रोख केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्याकडे होता. कवाडे यांच्या या वक्तव्यानंतर त्यांच्यावर मोठी टीका होत आहे. याबाबत आता जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रारही दाखल करण्यात आली आहे. हे आहे वादग्रस्त विधान

VIDEO : रावसाहेब दानवे पुन्हा चुकले! विंग कमांडर अभिनंदनबद्दल केलं 'हे' वक्तव्य

भाजप प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे आपल्या बोलण्यामुळे गेल्या काही दिवसांपासून सतत वादात सापडत आहेत. रावसाहेब दानवे यांनी जालन्यात केलेल्या वक्तव्यामुळे आता पुन्हा एकदा वाद निर्माण झाला आहे. कारण दानवे यांनी विंग कमांडर अभिनंदन यांचा 'हेलिकॉप्टरचा पायलट' असा उल्लेख केला आहे. वास्तविक अभिनंदन हे भारताच्या फायटर विमानांचे जिगरबाज पायलट आहेत. या नव्या वक्तव्यानंतर दानवे यांच्यावर पुन्हा एकदा टीकेचा भडिमार सुरू झाला आहे. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच पुलवामाबाबत बोलताना रावसाहेब दानवे म्हणाले होते की, 'पाकिस्तानने आपले 40 अतिरेकी मारले.' दानवेंच्या या वक्तव्यानंतर त्यांना मोठ्या रोषाला सामोरं जावं लागलं होतं. ऐका काय म्हणाले दानवे.

काँग्रेस-राष्ट्रवादीने प्रचारात काढली भाजप-शिवसेनेची 'लाज'

लोकसभेच्या निवडणुकीचा प्रचार आता रंगात आलाय. लोकांच्या कायम लक्षात राहिल अशा घोषणा आणि म्हणींचा वापर करण्याकडे राजकीय पक्षांचा नेहमीच कल असतो. काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीने आज नवी टॅगलाईन घेत भाजप-शिवसेनेवर हल्लाबोल केला. 'लाज कशी वाटत नाही' ही आघाडीच्या प्रचाराची टॅग लाईन आहे. अशी आहे मोहिम

VIDEO: असा आहे काँग्रेसचा जाहीरनामा; राहुल गांधींचं UNCUT भाषण

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी मंगळवारी नवी दिल्लीतील अकबर रोड येथील काँग्रेसच्या मुख्यालयात पक्षाचा जाहीरनामा सादर केला. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं सादर करण्यात आलेल्या या जाहीरनाम्यात नमूद असलेल्या गोष्टींबाबत बोलतांना ''सत्तेत आल्यानंतर काँग्रेस शेतकऱ्यांचं स्वतंत्र बजेट संसदेत सादर करणार'' असं राहुल गांधी म्हणाले. तसंच ''गरिबांना किमान उत्पन्न देण्याची हमी देण्यात आली आहे. ऐका राहुल गांधी यांचं भाषण

VIDEO: 'तुम्ही मोदींना प्रश्न विचारायला का घाबरता?' राहुल गांधी पत्रकारांवर भडकले

हम निभाएंगे' असं म्हणत काँग्रेसनं लोकसभा निवडणुकीसाठी जाहीरनामा प्रसिद्ध केला. नवी दिल्लीतील अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयात पार पडलेल्या या कार्यक्रमानंतर राहुल यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध विषयांचा उल्लेख करत मोदींवर हल्लाबोल केला. ''या सर्व गोष्टींबाबत तुम्ही मला प्रश्न विचारता, पण मोदींना प्रश्न वाचारायला का घाबरता?'' असा प्रश्न पत्रकारांना केला. राहुल म्हणाले

काँग्रेसचा जाहीरनामा म्हणजे 'टुकडे टुकडे गँग' - अरुण जेटली

केंद्रीय मंत्री अरुण जेटली यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर जोरदार टीका केली आहे. या जाहीरनाम्यातले मुद्दे सुचवणारं राहुल गांधींचं सल्लागार मंडळ म्हणजे 'टुकडे टुकडे गँग' आहे, असंही त्यांनी म्हटलं आहे. काँग्रेसचा जाहीरनामा धोकादायक आहे आणि तो राबवणं शक्य नाही, अशी टीका त्यांनी केली. हा आहे जेटलींचा युक्तिवाद

...म्हणून पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर सोशल मीडियावर 'नथुराम गोडसे' ट्रेंडिंग

सोमवारी वर्ध्यातील सभेत बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 'हिंदू दहशतवाद' मुद्यावरून काँग्रेसला लक्ष्य केलं. आपल्या भाषणात त्यांनी हिंदू धर्म जुना आहे. शांतीप्रिय आहे. त्याला हजारो वर्षांचा इतिहास आहे. हिंदू धर्मांनं कधीही हिंसा केली नाही. पण, काँग्रसनं मात्र हिंदूंना बदनाम केलं अशा शब्दात नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसला लक्ष्य केलं.असं आहे प्रकरण

VIDEO: खोतकरांचं बंड उद्धव ठाकरेंनी कसं केलं शांत? मुख्यमंत्र्यांनी सांगितली गोष्ट

''जालन्यात खोतकरांचं बंड थंड झालं असून, लोकसभा निवडणुकीत यंदा युतीच जिंकणार' असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. जालन्यातून उमेदवारी निश्चित झाल्यानंतर मंगळवारी रावसाहेब दानवे यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यापूर्वी पार पडलेल्या प्रचार सभेत बोलताना त्यांनी हे वक्तव्य केलं. काय म्हणाले मुख्यमंत्री

First published: April 2, 2019, 8:01 PM IST
Tags:

ताज्या बातम्या