पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे तर भारताची शस्त्र काय दिवाळीसाठी आहेत का? - मोदी

पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे तर भारताची शस्त्र काय दिवाळीसाठी आहेत का? - मोदी

'1971 च्या लढाईत भारताकडे पाकिस्तानचे 90 हजार सैनिक होते. त्यावेळी जर मोदी असते तर खूप काही मिळालं असतं.'

  • Share this:

बारमेर (राजस्थान)21 एप्रिल : लोकसभा निवडणुकीचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. मतदानाच्या तिसऱ्या टप्प्याचा प्रचार आज संपला. या सर्व प्रचारात पाकिस्तान, दहशतवाद आणि सुरक्षा हा मुद्दा गाजतोय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज याच मुद्यावरून पाकिस्तानला लक्ष्य केलं. पाकिस्तान आत्तापर्यंत अणुबॉम्बची भीती दाखवत होता, ती भीती आम्ही दूर केली. आमच्याकडची शस्त्रास्त्रे ही काही फक्त दिवाळीसाठी नाहीत अशा इशाराही त्यांनी दिला.

मोदी म्हणाले,  आत्तापर्यंत कायम पाकिस्तानच्या अणुबॉम्बची भीती दाखवली जात होती. पाकिस्तानही कायम म्हणत असे की आमच्याकडे अणुबॉम्ब आहेत म्हणून. माध्यमेही त्यांना जास्त महत्त्व देत होती. पाकिस्तानकडे अणुबॉम्ब आहे तर मग भारताकडे जी शस्त्रास्त्र आहेत ती काय फक्त दिवाळीसाठी आहेत का असा सवाल त्यांनी केला. पाकिस्तानला आता जशास तसे हा धडा शिकवला जाईल असंही ते म्हणाले.

पाकिस्तानने दहशतवादी कारवाया केल्यानंतर भारताने दहशतवाद्यांना त्यांच्या घरात घुसून मारलं हे योग्यच केलं. आता भारत शांत बसणार नाही असं पंतप्रधान म्हणाले.

त्या वेळेस मोदी असते तर...

1971 च्या लढाईत भारताकडे पाकिस्तानचे 90 हजार सैनिक होते. मात्र जागतिक दबावानंतर भारताने शिमल्यात करार करताना काहीही पदरात पाडून घेतले नाही. वाटाघाटीच्या टेबलावर भारताने सर्व गमावले. त्यावेळी जर मोदी असते तर असं झालं नसतं असंही ते म्हणाले.

First Published: Apr 21, 2019 07:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading