TDP-YSR काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; दोघांचा मृत्यू

मतदानादरम्यान TDP-YSR काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले. यामध्ये दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू झाला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 02:29 PM IST

TDP-YSR काँग्रेसचे कार्यकर्ते भिडले; दोघांचा मृत्यू

हैद्राबाद, 11 एप्रिल : देशात लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा पार पडतोय. 91 लोकसभा मतदारसंघात हे मतदान पार पडत आहे. याचवेळी आंध्र प्रदेशमध्ये देखील विधानसभेकरता मतदान पार पडत आहे. आंध्र प्रदेशातील टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसचा वाद सर्वश्रृत आहे. याच वादाचं पर्यवसन हाणामारीत झालं. मतदानादरम्यान टीडीपी आणि वायएसआर काँग्रेसचे कार्यकर्ते आपसांत भिडले. त्यामध्ये दोन कार्यकर्त्यांचा मृत्यू देखील झाला. या राजकीय वादामुळे कार्यकर्त्यांना मात्र आपला जीव गमवावा लागला आहे. परिस्थिती हाताबाहेर गेल्यानं पोलिसांनी लाठीचार्ज देखील केला. मृत्यू झालेल्या कार्यकर्त्यांमध्ये टीडीपीच्या आणि वायएसआर काँग्रेसच्या प्रत्येकी एका कार्यकर्त्यांचा समावेश आहे.


पूंछमध्ये EVM मध्ये छेडछाड, काँग्रेसच्या चिन्हासमोरील बटन दाबलं जात नाही : ओमर अब्दुल्ला


मशिन्स खराब, कार्यकर्ते भिडले

आंध्र प्रदेशमध्ये 100 ईव्हीएम मशिन्स खराब झाली. त्यामुळे मतदान ठप्प झालं. याच काळात दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आपसांत भिडले. त्यामध्ये दोघांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. दरम्यान, ईव्हीएम मशिन्स बंद पडल्यानंतर आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबु नायडू यांनी पुन्हा मतदानाची मागणी केली आहे.


मतदान केंद्राबाहेर वाटली नमो फूडचे पॅकेट्स


टीडीपी - YSR वाद

दरम्यान, टीडीपी आणि वायएसआरमधील वाद हा सर्वश्रृत आहे. चंद्रबाबु नायडू आणि जगनमोहन रेड्डी यांनी यापूर्वी देखील परस्परांना लक्ष्य केलं आहे. शिवाय, जगनमोहन रेड्डी यांनी राज्यभर पदयात्रा करत नायडू यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. आंध्र प्रदेशला विशेष राज्याचा दर्जा प्राप्त करण्यासाठी टीडीपी अपयशी ठरल्याची टीका देखील रेड्डी यांनी केली होती.


VIDEO: उमेदवाराने चक्क ईव्हीएमच जमिनीवर आदळलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 01:59 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...

Live TV

News18 Lokmat
close