अखेर साध्वी प्रज्ञा यांनी हेमंत करकरेंबद्दलचं 'ते' वक्तव्य घेतलं मागे; म्हणाल्या...

अखेर साध्वी प्रज्ञा यांनी हेमंत करकरेंबद्दलचं 'ते' वक्तव्य घेतलं मागे; म्हणाल्या...

हेमंत करकरे यांच्याबद्दल केलेलं विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी मागे घेतलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 19 एप्रिल : हेमंत करकरे यांना त्यांच्या कृत्याची शिक्षा मिळाली. त्यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला, असं विधान साध्वी प्रज्ञासिंह यांनी केलं होतं. मी तुरुंगात गेल्यानंतर लगेचच दीड महिन्यांत दहशतवाद्यांनी हेमंत करकरेंना मारलं, असंही त्या म्हणाले. त्यानंतर विरोधकांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्यावर टीका केली शिवाय, भाजपनं देखील याप्रकरणी हात झटकले. त्यानंतर साध्वी प्रज्ञासिंह यांनी आपलं विधान मागे घेत असल्याचं म्हटलं आहे. माझ्या विधानामुळे शहीदांच्या कुटुंबियांना त्रास झाला. शिवाय, विरोधकांना त्याचा फायदा होता कामा नये. त्यामुळे मी माझं विधान मागे घेत असल्याचं साध्वी प्रज्ञासिंह यांनी म्हटलं आहे.


'हेमंत करकरे यांना माझ्यासारख्या संन्याशांचा शाप भोवला', साध्वी प्रज्ञासिंह यांची मुक्ताफळं


भाजपचा संबंध नाही

साध्वी प्रज्ञासिंह यांच्या वक्तव्याशी भाजपचा संबंध नसून त्या वक्तव्याशी पक्ष सहमत नाही. 26/11च्या हल्ल्यात जे पोलीस अधिकारी शहीद झाले ते शहीदच आहेत असं भाजपचं मत आहे अशी भूमिका भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी मांडली. त्यावेळी केंद्रात आणि राज्यात काँग्रेसचं सरकार होतं असं असतानाही त्यांनी साध्वी प्रज्ञासिंह यांच्याविरुद्ध का खटला दाखल केला नाही असा सवाल उपाध्ये यांनी केला. 'न्यूज18 लोकमत'च्या 'बेधडक' या कार्यक्रमात पक्षानं आपले हाट झटकले होते. बॉम्ब स्फोटात वापरलेली मोटरसायकल ही साध्वी प्रज्ञासिंह यांच्या नावावर होती. त्यांच्याकडून जप्त करण्यात आलेल्या लॅप टॉपमध्ये मोहन भागवत यांच्या हत्येचा कटही सापडला होता. त्यावेळी भाजपचे नेते अभिनव भारतवर बंदी घालण्याची मागणी करत होते. नंतर मोदी आणि शहा आल्यानंतर परिस्थिती बदलली असा आरोप राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केला.


VIDEO : पार्थ पवारांची पंतप्रधान मोदींवर टीका, म्हणाले...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 19, 2019 07:59 PM IST

ताज्या बातम्या