नवी दिल्ली, 11 मे : राजधानी दिल्लीमध्ये भाजप उमेदवार गौतम गंभीर आणि आम आदमी पक्षामधील आरोप – प्रत्यारोपांचं युद्ध काही केल्या थांबताना दिसत नाही. गौतम गंभीर यांनी उमेदवार आतिशी मार्लिन यांच्याविरोधात आक्षेपार्ह पत्रक वाटल्याचा आरोप आपनं केला. त्यानंतर आक्रमक होत गुरूवारी गौतम गंभीर यांनी आरोप सिद्ध झाल्यास चौकात जाहीर फाशी घेईन असं आव्हान आपला दिलं आहे. ट्विटरवरून गौतम गंभीर यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना थेट आव्हान दिलं. जर आपनं आतिशी विरोधात आक्षेपार्ह पत्रक वाटण्यात माझा हात असल्याचं सिद्ध केल्यास मी चौकात फाशी घेईन. शिवाय, माझ्यावरील आरोप सिद्ध न झाल्यास अरविंद केजरीवाल यांना राजकीय संन्यास घ्यावा लागेल असं गंभीर यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.
Challenger Number 3 to @ArvindKejriwal and @aap. If he can prove that I have anything to do with this pamphlet filth, then I will hang myself in public. Otherwise @ArvindKejriwal should quit politics. Accepted?
— Chowkidar Gautam Gambhir (@GautamGambhir) May 10, 2019
काय आहे पत्रक वाद
पूर्व दिल्लीतील आप उमेदवार आतिशी मार्लिन यांच्याविरोधात वृत्तपत्रांमधून आक्षेपार्ह पत्रक वाटली गेली. त्यामध्ये आतिशी यांच्या उल्लेख हा वेश्या, बीफ इटर, मिक्स ब्रीड असा होता. यानंतर गुरूवारी आम आदमी पक्षानं पत्रकर परिषद घेत भाजप उमेदवार गौतम गंभीर यांनी ही पत्रक वाटल्याचा आरोप दिल्लीचे मुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनी केला. यावेळी आतिशी यांना पत्रकार परिषदेमध्ये रडू कोसळलं. पूर्व दिल्लीतील काही हाऊसिंग सोसायटींमध्ये ही आक्षेपार्ह पत्रक वाटण्यात आली.
आपच्या आरोपानंतर केजरीवाल यांना गौतम गंभीर यांनी देखील आव्हान दिलं.
गौतम गंभीर यांच्यावर आम आदमी पक्षानं केलेल्या आरोपानंतर आता गौतम गंभीरच्या बचावासाठी क्रिकेटर पुढे सरसावले आहेत. गौतम गंभीर यांची बाजू घेताना गौतम गंभीर जिंकेल किंवा हारेल हा वेगळा मुद्दा पण ते महिलेविरोधात चुकीचं वागू शकत नाहीत असं हरभज सिंग यांनी म्हटलं आहे.
तर, व्हिव्हिएस लक्ष्मण यांनी देखील गौतम गंभीरची बाजू घेतली आहे. दोन दशकांपासून गौतम गंभीर यांना ओळखतो. ते चुकीचं वागू शकत नाही. महिलांप्रति त्यांना किती आदर आहे याची मला कल्पना असल्याचं व्हिव्हिएस लक्ष्मण यांनी म्हटलं आहे.
राहुल गांधींनी चक्क हेलिकॉप्टर दुरुस्त करायला केली मदत, VIDEO व्हायरल