राहुल गांधी यांच्या जीवाला धोका? गृह मंत्रालयानं दिलं हे स्पष्टीकरण

राहुल गांधी यांच्या जीवाला धोका? गृह मंत्रालयानं दिलं हे स्पष्टीकरण

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला धोका असल्याचा काँग्रेसचा दावा गृहमंत्रालयानं फेटाळून लावला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 11 एप्रिल : 'काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर स्नायपरनं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला,' राहुल गांधी अमेठी येथे उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गेले असता त्यांना लक्ष्य करण्यात आलं होतं. त्यांच्या सुरक्षेत हलगर्जीपणा झाल्याचा दावा करत काँग्रेसनं चौकशीची मागणी केली होती. त्याबाबतचं पत्र देखील काँग्रेसनं गृह मंत्रालयाला लिहिल्याचं म्हटलं होतं.

त्यानंतर आता गृह मंत्रालयानं यावर आपली प्रतिक्रिया दिली आहे. त्यामध्ये गृह मंत्रालयानं याबाबतची माहिती एसपीजीनं दिली आहे. राहुल गांधी यांच्या जीवाला कोणताही धोका नाही. ज्या हिरव्या लाईटबद्दल बोललं जात आहे ती काँग्रेसच्या फोटोग्राफरच्या मोबाईलमधील आहे. शिवाय, काँग्रेसकडून कोणतंही पत्र मिळालं नसल्याचं गृह मंत्रालयानं म्हटलं आहे. राहुल गांधी यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्याचं म्हणत काँग्रेसनं गृह मंत्रालयाला पत्र लिहिलं होतं. त्यावर आता गृह मंत्रालयानं आपलं स्पष्टीकरण दिलं आहे. यावेळी काँग्रेसनं राजीव गांधी आणि इंदिरा गांधी यांच्या हत्येची देखील आठवण करून दिली.

राहुल गांधींच्या जीवाला धोका असल्याचा दावा; स्नायपरनं हल्ल्याचा प्रयत्न?

राहुल गांधींवर हल्ल्याचा प्रयत्न झाल्याचा दावा, निर्मला सीतारामण यांची पहिली प्रतिक्रिया

काय म्हटलं आहे काँग्रेसनं

'काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या जीवाला धोका आहे. त्यांच्यावर स्नायपरनं हल्ला करण्याचा प्रयत्न झाला,' असा दावा काँग्रेसनं केला आहे. दरम्यान, या प्रकरणामध्ये काँग्रेसनं केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांना पत्र लिहिलं असून चौकशीची मागणी केल्याचं म्हटलं आहे. पण, गृह मंत्रालयानं मात्र राहुल गांधी यांच्या सुरक्षेत काहीही हलगर्जीपणा झाला नसल्याचं म्हटलं आहे.

VIDEO: राफेल मुद्यावरून राहुल गांधींनी परत मोदींवर साधला निशाणा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 04:34 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading