EVM आणि VVPAT संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

EVM आणि VVPAT संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

EVM आणि VVPAT संदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागून राहिलं आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 07 मे : EVM संदर्भात विरोधकांची न्यायालयात धाव घेतली आहे. व्हिव्हिपॅट आणि ईव्हिएमची एकत्रित मोजणी करण्याच्या याचिकवर आज सर्वोच्च न्यायालयात महत्त्वाची सुनावणी होणार आहे.काँग्रेससह 21 विरोधी पक्षांनी ही याचिका दाखल केली आहे. विरोधी पक्षांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये 50 टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि EVM मतांची एकत्रित मोजणी करण्याची मागणी करण्यात आली आहे. EVMमध्ये घोळ असल्याचा आरोप यापूर्वी देखील करण्यात आला आहे. 50 टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी, अशी मागणी विरोधकांनी या याचिकाद्वारे केली आहे.

जॅमर बसवण्याची मागणी

सोमवारी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस शिष्टमंडळाने राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी यांची भेट घेतली. यावेळी 'ईव्हीएमबाबत खबरदारी घेतली पाहिजे. सर्व ईव्हीएम या स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आल्या आहेत. या मशीन्सला कुणी मोबाईल टॉवर, वायफाय नेटवर्कच्या माध्यमातून टॅम्पर करू नये, म्हणून जॅमर बसवण्यात यावेत. तसंच प्रत्येक राउंड निकाल जाहीर केला पाहिजे,' अशा मागण्या काँग्रेसकडून करण्यात आल्या आहेत.


..तर काँग्रेस नेत्यांनी इव्हीएम स्ट्रॉंग रूम बाहेरच झोपावे; गिरीश महाजनांची खोचक टीका

EVMबाबत शंका

विरोधकांकडून यापूर्वी देखील ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. ईव्हीएमचा फायदा हा भाजपला होत असल्याचा आरोरप विरोधकांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून याविरोधात सातत्यानं आरोप होत आहेत. ईव्हीएम हॅक करून भाजप निवडणुका जिंकत अससल्याचा आरोप देखील करण्यात आला.


..शरद पवारांनी पाणी-शेतीबाबत कायमस्वरूपी कोणत्या योजना राबवल्या?-उद्धव ठाकरे

निकाल उशिरा?

विरोधकांची मागणी सर्वोच्च न्यायालयानं मान् केल्यास लोकसभा निवडणुकीचे निकाल 2 ते 3 दिवस उशिरा लागण्याची शक्यता देखील व्यक्त केली जात आहे. कारण, 50 टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि EVM मतांची एकत्रित मोजणी करण्यासाठी वेळ लागू शकतो. त्यामुळे सर्वोच्च न्यायालय आज काय निर्णय देणार हे पाहावं लागणार आहे.


SPECIAL REPORT: बंगालमधील रक्तरंजित हिंसाचाराचं नेमकं कारण काय?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 09:39 AM IST

ताज्या बातम्या