'लोकांनीच सर्वपक्षीय वाचाळवीरांची तोंड बंद करावीत'

'कुणी पातळी सोडली म्हणजे त्याला उत्तर देताना त्यांनीही पातळी सोडावी असं नाही.'

News18 Lokmat | Updated On: May 8, 2019 06:43 PM IST

'लोकांनीच सर्वपक्षीय वाचाळवीरांची तोंड बंद करावीत'

मुंबई 08 मे : लोकसभेच्या मतदानाचे आता फक्त दोन टप्पे राहिलेले असताना सर्वपक्षीय नेत्यांकडून होणाऱ्या वक्तव्यांमुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले. राजकारणात किमान सभ्यतेचं पालन करावं असं  बोललं जातं. मात्र आरोप-प्रत्यारोपांची राळ एवढी मोठी आहे ज्यांनी समाजापुढे आदर्श ठेवावा अशी अपेक्षा असते तेच नेते असं का बोलतात असा प्रश्न पडतो. देशातल्या नागरिकांनीच या नेत्यांची तोंड बंद करावी असं मत न्यूज18 लोकमतच्या बेधडक कार्यक्रमात तज्ज्ञांनी व्यक्त केलं.

पत्रकार जयंत माईणकर, भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये, काँग्रेसचे प्रवक्ते रत्नाकर महाजन, राष्ट्रवादीचे सरचिटणीस अर्जुन टिळे, अपलं महानगरचे संपदाक मिलिंद राजगुरे यांनी सहभाग घेतला.


निवडणुकीच्या प्रचारात सर्वच नेत्यांची जीभ घसरते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचा भ्रष्टाचारी नंबर वन असा उल्लेख केला आणि या वादात भर पडली. सर्वच राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या नेत्यांनी मर्यादांचं पालन केलं पाहिजे असं मत काँग्रेसचे प्रवक्ते जयंत महाजन यांनी व्यक्त केलं. देशात कोण व्देषाचं राजकारण करत आहे हे लोकांना माहित आहे असा टोलाही त्यांनी भाजपला लगावला.

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी हे गेल्या काही वर्षांपासून आक्रमक झाले आहेत. चौकिदार चोर है ही त्यांची घोषणा चांगलीच गाजली. ट्विटरवरूनही त्यांनी मोदींना अहंकारी, मानसिक रोगी, हिटलर अशी अनेक विशेषणं प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे लावली होती. डिक्शनरीतल्या सर्व शिव्यांची लाखोळी काँग्रेसने पंतप्रधान मोदींना वाहिली असा आरोप भाजपचे प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी केलाय या वादग्रस्त वक्तव्यांची सुरूवात काँग्रेसनेच केली असा आरोपही त्यांनी केला.

Loading...

तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हा अफवा पसरविणारा कारखाना आहे असा थेट आरोप पत्रकार जयंत माईणकर यांनी केला. पंडित नेहरु, इंदिरा गांधी, राजीव गांधी यांच्याबद्दल त्यांच्या धर्माबद्दल, त्यांच्या वयक्तिक आयुष्याबद्दल संघाने अफवा पसरविल्या आणि बदनाम केलं असा आरोपही माईणकर यांनी केला.

कोण काय म्हणाले?

पंतप्रधान नरेंद्र मोदी - मिस्टर क्लिन अशी प्रतिमा असले राजीव गांधी यांचा शेवट भ्रष्टाचारी नंबर वन असा झाला.

राहुल गांधी - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अहंकारी नेते. आपलेच गुरू असलेल्या अडवाणींना त्यांनी जोरदार फटका मारला.

प्रियंका गांधी - मोदी हे दुर्योधन आहेत. त्यांचा अहंकार टिकणार नाही.

दिग्विजय सिंग - पंतप्रधान नरेंद्र मोदी हे ठग आहेत.

संजय निरुपम - नरेंद्र मोदी म्हणजे आधुनिक औरंगजेब आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 8, 2019 06:43 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...