भाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना

भाजपच्या या मंत्र्यानं 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली राहुल गांधींची तुलना

गुजरातमधील भाजपच्या मंत्र्यांनी काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना कुत्र्याच्या पिल्लाशी केली आहे.

  • Share this:

अहमदाबाद, 19 एप्रिल : 'राहुल गांधी यांना शंकराप्रमाणे विष पाजा. त्यानंतर ते लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत जिवंत राहतात का? ते पाहा.' गुजरातमधील पर्यावरण मंत्री गणपत वसावा यांनी काही दिवसांपूर्वी केलेल्या वादग्रस्त विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता. या वादाला अद्याप महिना देखील झालेला नाही तोच वसावा यांनी पुन्हा वादग्रस्त विधान करत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना ही 'कुत्र्याच्या पिल्ला'शी केली आहे. यावेळी बोलताना गुजरातचे पर्यावरण मंत्री वसावा यांनी 'नरेंद्र मोदी ज्यावेळी उभे राहतात तेव्हा गुजरातचा वाघ उभा राहिला आहे असं वाटतं. पण, ज्यावेळी राहुल गांधी उभे राहतात तेव्हा कुत्र्याचं पिल्लू शेपटी हालवत आहे असं वाटतं' असं वादग्रस्त विधान केलं आहे. त्यापुढे देखील वसावा यांनी 'जर पाकिस्ताननं भाकरीचं आमिष दाखवलं तर राहुल गांधी तिकडे देखील जातील. तसंच चीननं देखील भाकरीचं आमिष दाखवलं तर राहुल गांधी तिकडे देखील जातील' असं देखीव वसावा यांनी म्हटलं आहे.

अमेठी : राहुल गांधींवर नवं संकट, रद्द होऊ शकते उमेदवारी!

काँग्रेसनं केला निषेध

वसावा यांच्या या विधानाचा गुजरातच्या प्रदेश काँग्रेसनं निषेध केला असून यातून भाजप नेत्यांची मानसिकता दिसत असल्याचं अमित चावडा यांनी म्हटलं आहे. गणपत वसावा यांच्या वादग्रस्त विधानाची ही काही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी देखील वसावा यांनी राहुल गांधींविरोधात वादग्रस्त विधान केलं होतं.

मतं मागायला आलेल्या भाजप उमेदवाराला रहिवाशांनी पाजलं दूषित पाणी

काय म्हणाले होते गणपत वसावा

'राहुल गांधी यांना शंकराप्रमाणे विष पाजा, शिवाय, त्यानंतर ते लोकसभा निवडणुकीच्या निकालापर्यंत जिवंत राहतात का? ते पाहा.' 'मी सोशल मीडियावर पाहिलं की, काँग्रेसच्या एका नेत्यानं राहुल गांधी हे शंकराचा अवतार आहेत असं लिहिलं होतं. त्यावर आपल्या तरूणांनी लगेचच प्रतिक्रिय दिली. शंकर लोकांचं दु:ख दूर करण्यासाठी विष प्यायले होते. त्याप्रमाणे राहुल गांधी यांना देखील विष पाजा आणि निवडणुकांपर्यंत जिवंत राहिले तर ते शंकराचा अवतार आहेत म्हणता येईल असं म्हटलं होतं.' गणपत वसावा यांनी केलेल्या विधानावरून मोठा वाद निर्माण झाला होता.

VIDEO : काँग्रेस नेत्याचा पोलीस स्टेशनमध्ये राडा, आरोपीच्या लगावली कानाखाली!

First published: April 20, 2019, 6:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading