महात्मा गांधींचे खूनी आज सत्तेत : फारूख अब्दुल्ला

महात्मा गांधींचे खूनी आज सत्तेत : फारूख अब्दुल्ला

जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारूख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर गंभीर आरोप केला आहे.

  • Share this:

श्रीनगर, 7 एप्रिल : नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी जम्मू काश्मीरमध्ये मोदी सरकार आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर हल्लाबोल केला. फारूख अब्दुल्ला यांनी आरएसएसवर महात्मा गांधी यांच्या हत्येचा आरोप केला. श्रीनगरमध्ये एका सभेत बोलताना काश्मीरचे माजी मुख्यमंत्री असलेल्या फारूख अब्दुलांनी हा आरोप केला.

नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारूख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर आरोप केला आहे. महात्मा गांधींना मारणारे कोण आहेत? गांधींचा खून करणारे 'आरएसएस'वाले आज देशभर आहेत. दिल्लीत जे सरकार आहे ते त्यांचेच आहे ज्यांनी महात्मा गांधींचा खून केला असं फारूख अब्दुल्ला यांनी म्हटलं आहे.

यापूर्वी फारूख अब्दुल्ला यांनी सुरक्षादलासाठी बारामुल्ला-उधमपूर राष्ट्रीय महामार्ग आठवड्यातून 2 दिवस वाहतुकीला बंद ठेवण्याचा निर्णय घेतल्याबद्दल जम्मू काश्मीर प्रशासनावर हल्लाबोल केला होता. हा रस्ता लाईफ लाईन असून वाहतूक बंद केल्यास याचा परिणाम इथल्या जनजीवनावर होईल. रस्ता बंद करण्याचा आदेश हुकुमशाहीचे द्योतक असल्याचे त्यांनी म्हटले होते.

बारामुल्ला-उधमपूर राष्ट्रीय महामार्ग आठवड्यातून दोन दिवस बंद ठेवण्याचा निर्णय आजपासून लागू करण्यात आला आहे. उत्तर काश्मीरमधील बालामुल्ला, श्रीनगर, काजीकुंड, जवाहर टनेल आणि बनिहालमधून उधमपूरकडे जाणारा मार्ग सुरक्षादलांना जाण्यासाठी मोकळा ठेवण्यात येणार आहे. यामुळे इतरांना हा रस्ता वाहतुकीसाठी उपलब्ध नसेल. पुलवामा हल्ल्यानंतर सुरक्षादलांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.

VIDEO: 'जिथे भाजप-सेनेचे उमेदवार तिथे राज ठाकरेंनी हमखास जाहीर सभा घ्यावी'

First published: April 7, 2019, 8:41 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading