पालकांनी मुलांना प्रियंका गांधींपासून दूर ठेवावं, स्मृती इराणींची टीका

पालकांनी मुलांना प्रियंका गांधींपासून दूर ठेवावं, स्मृती इराणींची टीका

'प्रियंका गांधी यांनी राजकारणासाठी मुलांचा असा वापर करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे.'

  • Share this:

नवी दिल्ली 02 मे : काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांच्यासमोर लहान मुलं 'चौकीदार चोर है'च्या घोषणा देणारा व्हीडीओ व्हायरल झाला आणि नव्या वादाला तोंड फुटलं. त्यावरूनच अमेठीच्या भाजपच्या उमेदवार आणि केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधी यांच्यावर टीका केलीय. सुसंस्कृत कुटुंबांनी आणि पालकांनी आपल्या मुलांना प्रियंका गांधी यांच्यापासून दूर ठेवावं असं स्मृती इराणी यांनी म्हटलं आहे. ANIला दिलेल्या मुलखतीत त्यांनी ही टीका केली.

अमेठीच्या दौऱ्यावर असताना प्रियंका गांधी यांच्या भोवती लहान मुलांनी गराडा घातला होता आणि ते चौकीदार चोर है अशा घोषणा देतात. ही घोषणाबाजी सुरू असताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना शिवीही घातली. शिवी घातल्याबरोबर प्रियंकांनी तोंडावर हात ठेवल्याचं व्हीडीओत दिसतं आहे. हा व्हीडीओ व्हायरल झाल्यानंतर त्याच्यावर सोशल मीडियातून टीकेची झोड उठली.

हाच आहे का आदर्श?

ही संधी साधत स्मृती इराणी यांनी प्रियंका गांधी यांच्यावर पलटवार केलाय. त्या म्हणाल्या, प्रियंका या मुलांसमोर कुठला आदर्श ठेवत आहेत? त्या मुलांना चुकीची शिकवण देत आहे. पंतप्रधानांना दुषणं देण्यासाठी त्या मुलांना सांगत आहेत. या कृतीतून प्रियंका गांधी यांचं खरं रुप दिसलं अशी टीकाही त्यांनी केली.

राजकारणासाठी मुलांचा असा वापर करणं हे पूर्णपणे चुकीचं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यावर प्रियंका गांधी यांनी केलेली टीकाही अत्यंत खालच्या पातळीवरची आहे असंही त्या म्हणाल्या. राहुल गांधींच्या मदतीला प्रियंका गांधी आल्या आहेत त्याचं कारण म्हणजे राहुल हे अकार्यक्षम आहेत अशी टीकाही त्यांनी केली.

VIDEO अक्षरमंत्र- भाग 20 : अक्षरांच्या सरावानंतर आता अकांचा अभ्यास; आजचे अंक - ५, ६, ७, ८

First published: May 2, 2019, 2:28 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading