मोदींचा दावा खरा की खोटा? राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यावर माजी अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

मोदींचा दावा खरा की खोटा? राजीव गांधींबद्दलच्या वक्तव्यावर माजी अधिकाऱ्याचा मोठा गौप्यस्फोट

राजीव गांधी यांच्याविरोधात नरेंद्र मोदी यांनी केलेल्या दाव्याबाबत आता माजी नौदल अधिकाऱ्यानं मोठा गौप्यस्फोट केला आहे.

  • Share this:

नवी दिल्ली, 09 मे : काँग्रेसच्या सर्वात मोठ्या नामदार परिवाराने देशाची आन बाण आणि शान असलेल्या INS विराटचा टॅक्सीप्रमाणे वापर केला होता. राजीव गांधी पंतप्रधान असताना 10 दिवसांच्या सुट्टीवर होते. तेव्हा INS विराटचा वापर केल्याचा आरोप नरेंद्र मोदी नवी दिल्लीतील भाषणादरम्यान केला होता. त्यावरून मोठा वाद निर्माण झाला. पण, आता माजी नौदल अधिकाऱ्यांनं याबाबत 'न्यूज18'कडे मोठा गौप्यस्फोट केला आहे.

काय म्हणाले निवृत्त अधिकारी

राजीव गांधी आणि त्यांच्या पत्नीची ट्रिप पूर्णता ऑफिशिअल होती. ही ट्रिप दोन दिवसांची होती. यामध्ये सर्व नियम पाळण्यात आले होते. कुणीही सुट्टीवर नव्हतं. यापूर्वी देखील काही पंतप्रधान INS विराटवरती आले आहेत. नरेंद्र मोदींचा दावा चुकीचा आहे. यावेळी राहुल गांधी राजीव गांधी यांच्यासोबत होते. कुणीही विदेशी पाहुणा यावेळी नसल्याचं विनोद पसरिया यांनी म्हटलं आहे. विनोद पसरिया हे निवृत्त व्हाईस अ‍ॅडमिरल आहेत.

दरम्यान, विनोद पसरिया यांच्या दाव्यामुळे आता या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे.


‘नरेंद्र मोदींना PM बनण्यापासून जगातील कोणतीच ताकद रोखू शकत नाही’

‘राजीव गांधी भ्रष्टाचारी नंबर 1’

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यापूर्वी देखील राजीव गांधी यांच्यावर टीका केली होती. "तुमच्या वडिलांच्या पाठीराख्यांनी त्यांची 'मिस्टर क्लिन' अशी प्रतिमा तयार केली. पण 'भ्रष्टाचारी नंबर 1' अशा ओळखीनेच त्यांचा शेवट झाला," असं विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राजीव गांधी यांच्याविरोधात केलं होतं. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींवर सर्वच स्तरातून टीका झाली.


सुट्टीच्या काळात राजीव गांधी यांनी INS विराटचा वापर केला? मोदींच्या दाव्यामागील काय आहे वास्तव


राहुल गांधींचं प्रत्युत्तर

काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी 'मोदीजी, लढाई आता संपली आहे. तुमचं कर्म तुमची वाट पाहतंय. तुमची तुमच्या स्वत:बद्दल असलेली मते माझ्या वडिलांवर लादल्याने तुम्ही वाचू शकणार नाही. माझ्याकडून तुम्हाला खूप सारं प्रेम आणि मिठी, असं ट्विट करत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उत्तर दिलं होतं.


VIDEO: विरोधकांनी जवळपास 56 अपशब्द वापरले-नितीन गडकरी

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 9, 2019 02:44 PM IST

ताज्या बातम्या