हॉटेलमध्ये सापडलं EVM; लोकांनी व्यक्त केला तीव्र संताप

बिहारमध्ये हॉटेलमध्ये ईव्हीएम सापडल्यानं नागरिकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.

News18 Lokmat | Updated On: May 7, 2019 11:59 AM IST

हॉटेलमध्ये सापडलं EVM; लोकांनी व्यक्त केला तीव्र संताप

मुझ्झफरपूर, 07 मे : EVMवरून विरोधक सध्या आक्रमक झाले आहेत. सत्ताधारी भाजप EVMचा गैरवापर करत असल्याचा आरोप देखील केला जात आहे. त्यानंतर आता 21 विरोधीपक्षांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये दाखल केलेली पुनर्विचार याचिका देखील फेटाळून लावण्यात आली आहे. या पार्श्वभूमिवर आता बिहारमधील मुझ्झफरपूर येथील हॉटेलमधून एक ईव्हीएम ताब्यात घेण्यात आलं आहे. यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. शिवाय, लोकांनी देखील तीव्र संताप व्यक्त केला आहे. घटनास्थळी पोहोचल्यानंतर SDO कुंदन कुमार यांनी EVM आपल्या ताब्यात घेतलं. EVMबाबत झालेल्या हलगर्जीपणाबाबत आता काय कारवाई होणार? असा सवाल विचारला जात आहे. याप्रकरणात आता EVMचे कस्टोडियन अवधेश कुमार यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.Loading...


शरद पवारांसह सर्व विरोधकांना दणका; EVMबाबतची पुनर्विचार याचिका SCनं फेटाळली

कसं पोहोचलं EVM हॉटेलमध्ये?

अवधेश कुमार यांना एक ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट जास्तीचं देण्यात आला होता. त्याला हॉटेलमध्ये ठेवण्यात आलं होतं. बुथ नंबर 108 जवळ असलेल्या हॉटेल आनंदमध्ये हे EVM ठेवण्यात आले होते.

पुनर्विचार याचिका फेटाळली

EVM संदर्भात विरोधीपक्षांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. आपल्या याचिकेमध्ये 50 टक्के व्हिव्हिपॅट मशीन आणि EVM मतांची एकत्रित मोजणी करण्याची मागणी 21 विरोधीपक्षांनी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं विरोधकांची पुनर्विचार याचिका फेटाळून लावली आहे. EVMमध्ये घोळ असल्याचा आरोप यापूर्वी देखील करण्यात आला होता. त्याचा फायदा हा भाजपला होत असून 50 टक्के व्हीव्हीपॅट मशीनची मोजणी करण्यात यावी अशी मागणी विरोधकांनी केली होती. पण, सर्वोच्च न्यायालयानं विरोधकांची ही मागणी फेटाळून लावली आहे, यामध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला आहे. त्यामुळे विरोधकांना धक्का बसला आहे.
या ठिकाणच्या 300 मतदान केंद्रांवर पडलं नाही एकही मत

EVMबाबत शंका

विरोधकांकडून यापूर्वी देखील ईव्हीएमबाबत शंका उपस्थित करण्यात आल्या आहेत. ईव्हीएमचा फायदा हा भाजपला होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला आहे. मागील काही दिवसांपासून याविरोधात सातत्यानं आरोप होत आहेत. ईव्हीएम हॅक करून भाजप निवडणुका जिंकत असल्याचा आरोप देखील करण्यात आला.


VIDEO: किती जागा जिंकून येतील याबाबत मी कधीच रॅलीत बोललो नाही- अमित शहा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 7, 2019 11:59 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...