News18 Lokmat

VIDEO 'ज्यांना पराभव दिसतो ते सर्वच EVMला दोषी ठरवतात'

'पराभव झालेले सर्वच पक्ष EVMला दोष देतात. कुठल्याही परिस्थितीत मतपत्रिकेव्दारे मतदान होऊ नये.'

News18 Lokmat | Updated On: Apr 25, 2019 11:07 PM IST

VIDEO 'ज्यांना पराभव दिसतो ते सर्वच EVMला दोषी ठरवतात'

नवी दिल्ली 25 एप्रिल : निवडणुकीमध्ये ज्यांचा पराभव होतो किंवा ज्या पक्षांना पराभव जिसतो ते सगळे पक्ष EVMवर खापर फोडतात असं मत विविध तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा विरोधी पक्षांनी EVM वर आपला संशय व्यक्त केलाय. विरोधकांच्या या दाव्यात तथ्य आहे का? EVM मशिन्स हॅक करता येऊ शकतात का? यावर 'सीएनबीसी आवाज' च्या चुनाव अड्डा या कार्यक्रमात चर्चा झाली.

पत्रकार शेषनारायण सिंग म्हणाले, काही दशकांपासून पराभवाचा सामना करावे लागणारे पक्ष असे आरोप करत आले आहेत. 1971 मध्ये जनसंघाचा दारुण पराभव झाला. त्यावेळी जनसंघाचे अध्यक्ष असलेले बलराज मधोक यांनी असा आरोप केला होता की अशी शाई वापरली जाते की दिव्यावर शिक्का मारला की तो गाय वासरावर शिक्का बसतो. त्यावेळी जनसंघाचं चिन्ह दिवा तर काँग्रेसचं चिन्ह गाय वासरू असं होतं. कुठल्याही परिस्थितीत मतपत्रिका येवू नयेत असं मतही त्यांनी व्यक्त केलं.विरोधकांची पत्रकार परिषद

Loading...

लोकसभेच्या निवडणुकीचा तिसरा टप्पा सुरू असताना विरोधी पक्षांनी पुन्हा एकदा EVM मशिन्सबद्दल शंका उपस्थित केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू यांनी थेट मुंबईत येऊन राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत 23 एप्रिलला पत्रकार परिषद घेतली आणि अतिशय गंभीर आरोप केले. इव्हीएम हॅक करता येऊ शकतं. किंवा त्यात तांत्रिक छेडछाड करता येते असा या पक्षांचा दावा आहे. एवढंच नाही तर ईव्हीएम रशियातून नियंत्रित केलं जातं असा आरोप सुद्धा चंद्रबाबू नायडू यांनी केला आहे.कायम संशयच

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटविषयी मतभेद काही आता पाच वर्षात निर्माण झाले नाहीत. गेल्या अनेक वर्षांपासून त्याविषयी संशय व्यक्त करण्यात येत आहे. काँग्रेस सत्तेत असताना भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांनीही EVM मशिन्सवर संशय व्यक्त केला होता. तर भाजपचे प्रवक्ते ईव्हीएल नससिंहन यांनी त्यावर पुस्तकही लिहलं होतं.हॅकिंग शक्य नाही

आज मतदानासाठी ज्या मशिन्स वापरल्या जातात त्या अतिशय साध्या तंत्रज्ञानाने तयार करण्यात आल्या आहेत. इंटरनेट, ब्लु टुथ किंवा इतर कुठलही तंत्रज्ञान यात नसते. त्याच बरोबर हे स्वदेशी तंत्रज्ञान आहे. त्यामुळे या मशिन्स हॅक करता येत नाहीत असं मत तज्ज्ञांनी व्यक्त केलंय.आव्हान स्वीकारणार?

ईव्हीम मिशिन्सवर झालेल्या आरोपानंतर निवडणूक आयोगाने या मशिन्स हॅक करून दाखवा असं आव्हान सर्वच राजकीय पक्षांना दिलं होतं. मात्र कुठल्याही राजकीय पक्षाने किंवा तज्ज्ञाने ते आव्हान स्वीकारलं नाही. त्याचबरोबर निवडणूक आयोगाने आत्तापर्यंत सर्व शंकाची सविस्तर उत्तरंही दिली आहेत.

भारतात प्रचंड मोठ्या प्रमाणावर या मशिन्सचा वापर केला जातो. एवढ्या मोठ्या प्रमाणावर वापर होत असताना काही चुका होतात. काही मशिन्स बिघडतात. कुठल्याही पद्धतीचा वापर केला तरी काही त्रुटी राहू शकतात त्याचा अर्थ सर्व यंत्रणार अयोग्य नाही असा निष्कर्ष काढता येत नाही असं निवडणूक आयोगाने याआधी अनेकदा जाहीर केलं आहे. पारंपरिक मतपत्रिकेने मतदान घेणं शक्य नाही असंही आयोगाने जाहीर केलं होतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 25, 2019 11:07 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...