VIDEO : 'निवडणुकीतला हिंसाचार कमी व्हावा असं कुणालाच वाटत नाही'

VIDEO : 'निवडणुकीतला हिंसाचार कमी व्हावा असं कुणालाच वाटत नाही'

या अधोगतीला फक्त राजकीय पक्षच जबाबदार नाहीत. सर्वच स्तरावर सुधारणा झाली पाहिजे.

  • Share this:

मुंबई 16 मे : सर्व देशभर लोकसभेची निवडणूक शांततेत पार पडत असताना पश्चिम बंगालमध्ये मात्र हिंसाचाराचं गालबोट लागलं. तृणमूल काँग्रेस आणि भाजपमध्ये थेट सामना झाल्याचं पाहायला मिळालं. त्यावरून जोरदार राजकीय रणकंदन माजलं आहे. निवडणूक आयोगावरही आरोप होताहेत. मात्र निवडणुकीच्या या अधोगतीला सर्वच राजकीय पक्ष जबाबदार असल्याचं मत अभ्यासकांनी व्यक्त केलंय.

या अधोगतीला फक्त राजकीय पक्षच जबाबदार नाहीत. सर्वच स्तरावर सुधारणा झाली पाहिजे. काँग्रेसच्या काळातही अशाच प्रकारचे आरोप झाले आहेत. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या लोकांना उमेदवारी दिली जाऊ नये असं सगळेच म्हणतात मात्र त्याचं पालन कुणीही करत नाही अशी खंत ज्येष्ठ पत्रकार अलोक मेहेता यांनी व्यक्त केली. निवडणुकीतला हिंसाचार कमी व्हावा असं कुणालाच वाटत नाही अशी खंतही त्यांनी व्यक्त केली.

आयोगाची भूमिका संशयस्पद असल्याचा आरोप टीएमसीकडून करण्यात येत आहे. प्रचार समाप्तच करायचा असेल तर तो पाच वाजताच का करण्यात आला नाही. रात्री 10 पर्यंत थांबण्याची काय गरज होती असा सवालही तृणमूलकडून विचारण्यात येतोय.

आजही पश्चिम बंगालमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडल्या. ममता बॅनर्जी यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांना जेलमध्ये टाकण्याची धमकी दिली. तर पश्चिम बंगाल म्हणजे ममता बॅनर्जी यांची जहागीर नाही अशी घणाघाती टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली.

पश्चिम बंगालमध्ये प्रचाराच्या शेवटच्या दिवशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. नरेंद्र मोदी म्हणाले पश्चिम बंगाल ही काही ममता बॅनर्जी आणि त्यांच्या भाच्याची जहागीर नाही. हे राज्य भारताचं अविभाज्य अंग आहे. यापुढे दीदींची दादागिरी चालणार नाही अशा इशाराही त्यांनी दिला.

मंगळवारच्या हिंसाचारानंतर निवडणूक आयोगाने ऐतिहासिक निर्णय घेत पश्चिम बंगालमधला निवडणूक प्रचार एक दिवस आधीच बंद करण्याचा निर्णय घेतला. 19 तारखेला होणाऱ्या मतदानाचा प्रचार 17 मे रोजी संपणं अपेक्षित होतं. मात्र आयोगाच्या आदेशानंतर 16 मे रोजीच प्रचाराची सांगता होत आहे. त्यामुळे डम डम इथं होणाऱ्या पंतप्रधानांच्या रॅलीकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं.

पंतप्रधान म्हणाले, ममता दीदींना पंतप्रधान पदाचं स्वप्न पडत आहे. त्यांना हे स्वप्न पाहण्याचा पूर्ण अधिकार आहे. मात्र सुरक्षा दलांविरुद्ध तुम्ही गुंडांचा वापर केल्यामुळे तुमची विश्वसनियता पूर्णपणे संपली आहे. डाव्यांची सत्ता असताना त्यांनी तुमच्या समोर अशीच स्थिती निर्माण केली होती. त्यावेळी निवडणूक आयोगाने नि:पक्षपातीपणे निवडणूक घेतली होती. आज तुम्ही ते सगळं विसरल्या आहात अशी टीकाही पंतप्रधानांनी यावेळी बोलताना केली.

First published: May 16, 2019, 9:45 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading