News18 Lokmat

निवडणूक आयोगाच्या कारवाईत 607 कोटींची रोकड, 198 कोटींची दारू जप्त

निवडणुक आयोगाने तारखांची घोषणा केल्यानंतर आत्तापर्यंत 2 हजार 626 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 11, 2019 09:37 PM IST

निवडणूक आयोगाच्या कारवाईत 607 कोटींची रोकड, 198 कोटींची दारू जप्त

नवी दिल्ली 11 एप्रिल : निवडणुकीचा प्रचार सुरू झाला की पैशांचा खेळ सुरू होतो. निवडणुक आयोगाने तारखांची घोषणा केल्यानंतर आत्तापर्यंत 2 हजार 626 कोटी  रुपयांचा मुद्देमाल जप्त केल्याची माहिती निवडणूक आयोगाने दिली आहे. त्यामुळे याही लोकसभा निवडणुकीत पैशाचा महापूर आल्याचं स्पष्ट झालंय.

आचारसंहिता लागल्यापासून  देशाच्या वेगवेगळ्या भागात छापे मारून 2626 कोटींचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. यात 607 कोटींची रोख रक्कम, 198 कोटींची दारू, 1091कोटींचे अंमली पदार्थ, 486 कोटींचं सोनं आणि चांदी, तर 49 कोटींच्या इतर वस्तू जप्त केल्याची माहिती निवडणूक आयोगाने आज दिली.

दारू आणि अंमली पदार्थ

निवडणूक आयोगानं ही माहिती दिली आहे. या जप्तीच्या कारवाईत सर्वाधिक रोख रक्कम आणि सोने तमिळनाडूत, सर्वाधिक दारू महाराष्ट्रात तर सर्वाधिक अंमली पदार्थ गुजरातमध्ये पकडण्यात आली आहेत.

निवडणुकीच्या काळात सर्वच राजकीय पक्ष पैशाचा वारेमाप वापर करत असतात. तर मतदारांना अमिष दाखविण्यासाठी दारू आणि अंमली पदार्थाचा वापर होत असतो. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी सुरू झाल्यानंतही पैशाचा खेळ सुरूच असतो.

Loading...

मध्यप्रदेशात काय झालं?

मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमलनाथ यांच्याशी संबंधित अधिकारी आणि जवळच्या लोकांवर आयकर विभागाने छापे घालून कारवाई केली होती. या कारवाईमुळे मध्यप्रदेशात खळबळ निर्माण झाली आहे. राजकीय हेतूने ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केलाय. तर निवडणुकीच्या कमासाठी या पैशाचा उपयोग करण्यात येत होता असा आरोप पंतप्रधानांनीही केला होता. या छाप्यातून 9 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आलीय. तर हे छापे राजकीय कारणांमुळे घातले जात असल्याचा आरोप मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री कमननाथ यांनी केला आहे.

मुख्यमंत्री कमलनाथ यांचे खासगी सचिव प्रविण कक्कड यांच्या विश्वासातले प्रतीक जोशी आणि अश्विन शर्मा यांच्या निवासस्थानी हे छापे घालण्यात आले होते. या कारवाईची माहिती निवडणूक आयोगालाही देण्यात आली आहे. गेल्या 40 तासांपासून मध्यप्रदेशसह देशभरातल्या 50 ठिकाणी ही कारवाई करण्यात येत आहे.

रविवारी पहाटे तीन वाजता ही कारवाई करण्यात आली. भोपाळ, दिल्ली, कोलकता आणि गोव्यात ही कारवाई करण्यात येत आहे. यासाठी CRPF च्या जवानांची मदत घेण्यात आली आहे. CRPF  आणि मध्यप्रदेश पोलिसांमध्येही वादही झाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 11, 2019 09:31 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...