News18 Lokmat

'निवडणूक आयोग' करतो भाजपच्या इशाऱ्यावर कारवाई - 'बसपा'चा आरोप

'सरकारच्या योजना राबविताना त्याचा लाभ हा जात-पात पाहून कुणाला मिळत नसतो. हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई अशा सगळ्यांनाच त्याला लाभ मिळाला.'

News18 Lokmat | Updated On: Apr 16, 2019 08:41 PM IST

'निवडणूक आयोग' करतो भाजपच्या इशाऱ्यावर कारवाई - 'बसपा'चा आरोप

नवी दिल्ली 16 एप्रिल : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी हिंदू आणि मुस्लिमांबद्दल वक्तव्य करून वादाला सुरुवात केली. मात्र त्यांच्यावर उशीराने कारवाई केली गेली. आज सर्व देशाला माहिती आहे की निवडणूक आयोग हा फक्त भाजपच्या इशाऱ्यावरून काम करत असल्याचा गंभीर आरोप बहुजन समाज पक्षाचे नेत एम.एच. खान यांनी केला. निवडणूक आयोग निष्पक्ष नाही असा आरोपही त्यांनी केला.मतांसाठी ध्रुवीकरण

सर्वच पक्षांचे नेते ज्या प्रकारे जाती आणि धर्माच्या आधारावर वक्तव्यं करत आहेत त्यावरच 'न्यूज18 इंडिया'च्या 'आर पार' या कार्यक्रमात चर्चा झाली. या कार्यक्रमातही नेत्यांनी एकमेकांवर आरोप केले आणि काही प्रवक्त्यांनी थेट निवडणूक आयोगालाच दोषी ठरवलं. निवडणूक आयोगाच्या कारवाईनंतरही ध्रुविकरणाचं राजकारण राजकीय पक्ष करत आहेत असा चर्चेचा विषय होता.

Loading...समाज दुभंगतो

तर सरकारच्या योजना राबविताना त्याचा लाभ हा जात-पात पाहून कुणाला मिळत नसतो. हिंदू, मुस्लिम, शिख, ईसाई अशा सगळ्यांनाच त्याला लाभ मिळाला असा युक्तिवाद भाजपच्या प्रवक्त्यांनी केला.

चर्चेत सहभागी झालेल्या एका तरुणाने भाजपचे प्रवक्ते गौरव भाटीया यांना प्रश्न केला की भाजपच्या राजवटीत मुस्लिमांना दहशतीचा सामना करावा लागतोय. यावर चर्चेत जोदार वाद झाला.विषयांवरचं लक्ष हटविण्याचा प्रयत्न

राजकीय नेते मतं मिळविण्यासाठी ध्रुविकरणाचं राजकारण करतात आणि मतं मिळवितात त्यामुळे समाज दुभंगला जातो असं मत एका तरुणाने व्यक्त केलं. तर बेरोजगारी, रोजगार, अर्थकारण या सर्व विषयांवरून लक्ष विचलीत करण्यासाठी भाजप अन्य धार्मिक विषय उकरून काढत असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रवक्ते अभय दुभे यांनी केला.सिद्धूचंही वादग्रस्त वक्तव्य

लोकसभा निवडणुकीत भाजपला मतदान करा. तुम्ही अल्पसंख्य असूनही बहुसंख्य आहात. तुम्ही एकजूट दाखवली तर इथले उमेदवार तारिक अन्वर यांना कुणीही हरवू शकत नाही, असं विधान माजी क्रिकेटर आणि पंजाबमधील काँग्रेसचे मंत्री नवज्योत सिंग सिद्धू यांनी केलं होतं. त्यावरून आता केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी प्रियांका गांधी यांना सिद्धू यांचं विधान देशाला कसं काय मजबूत करतं? असा सवाल केला आहे.

जाती –पातीमध्ये विभाजन करणं हे काँग्रेसच्या डीएनएमध्ये आहे. तसेच जेएनयुमध्ये ज्यावेळी देशाचे तुकडे होतील असं बोललं गेलं तेव्हा तिथं कोण गेलं होतं? असा सवाल देखील रविशंकर प्रसाद यांनी केला. राहुल गांधी यांच्या केरळमधील वायनाडमधून निवडणूक लढवण्याच्या मुद्यावरून देखील रविशंकर प्रसाद यांनी प्रियांका गांधी आम्हाला राष्ट्रवाद शिकवत असल्याची टीका  केली.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Apr 16, 2019 08:41 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...