• Home
 • »
 • News
 • »
 • national
 • »
 • वादग्रस्त वक्तव्यानंतरही समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्याची माफी नाही

वादग्रस्त वक्तव्यानंतरही समाजवादी पक्षाच्या प्रवक्त्याची माफी नाही

वाचाळवीरांना रोखायचं असेल तर निवडणूक आयोगाने त्यांना कडक शिक्षा करत त्यांच्यावर बंदी घालावी.

 • Share this:
  नवी दिल्ली 15 एप्रिल : वादग्रस्त वक्तव्यांसाठी ओळखले जाणारे समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्या वक्त्यव्याने देशभर वादळ निर्माण झालंय. भाजपच्या नेत्या जयाप्रदा यांच्याबद्दल खान यांनी जे वक्तव्य केलं त्यामुळे त्यांच्यावर निवडणूक आयोगाने बंदी घालावी अशी मागणी विविध पक्षांच्या प्रवक्त्यांनी केली. 'न्यूज18 इंडिया'च्या 'सुलगते सवाल' या चर्चेच्या कार्यक्रमात सहभागी झालेल्या मान्यवरांनी ही मागणी केली. भाजपकडून प्रेम शुक्ला, समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अनुराग भदौरिया, राकीय विश्लेषक दुष्यंत नागर, सोनम महाजन आणि ज्येष्ठ पत्रकार शेष नारायण सिंह या चर्चेत सहभागी झाले होते. चर्चेत सहभागी झालेल्या सर्वच मान्यवरांनी समाजवादी पक्षाचे प्रवक्ते अनुराग भदौरिया यांना बिनशर्त माफी मागा अशी मागणी केली मात्र भदौरिया यांनी माफी मागीतली नाही. उलट इतर पक्षातल्या नेत्यांनी काय वक्तव्य केलीत यावरच ते बोलत होते. त्यामुळे भदौरिया आणि इतर पाहुण्यांमध्ये जोरदार वाद-विवादही झाला. आझम खान यांच्यावर निवडणूक आयोगाने कारवाई का करू नये असा जेव्हा प्रश्न चर्चेत आला त्यावरही समाजवादी पक्षाचे प्रवक्ते हे माफी मागायचं दूरच ते उलट इतर पक्षांचीच उदाहरणं देत असल्याने चर्चेचं वातावरण गंभीर झालं. काय म्हणाले आझम खान? उत्तर प्रदेशातील रामपूर लोकसभा मतदारसंघातील जागेवरून पुन्हा एकदा आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरू झाली आहे. लोकसभा निवडणुकीतील भाजपच्या उमेदवार जयाप्रदा आणि सपा नेते आझम खान यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध रंगलं आहे. रामपूरमधील शाहबाद जिल्ह्यात एका प्रचारसभेला संबोधित करताना आझम खान यांनी माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्यासमोरच जयाप्रदांवर टीका करताना आक्षेपार्ह विधान केलं. आझम खान म्हणाले की,'राजकारण इतक्या खालच्या स्तरावर पोहोचलं आहे का? ज्यांनी 10 वर्ष रामपूरवासीयांचं रक्त शोषलं, ज्यांना बोट पकडून आम्ही रामपूरमध्ये आणलं. त्यांनी आमच्यावर नको-नको ते आरोप केले. त्यांचा खरा चेहरा ओळखण्यासाठी तुम्हाला 17 वर्ष लागली, मी 17 दिवसांमध्येच ओळखलं होतं  की यांची अंडरवेअर खाकी रंगाची आहे. तुम्ही त्यांना मतदान करणार का?. दरम्यान, हे विधान करताना आझम खान यांनी जयाप्रदा यांच्या नावाचा उल्लेख केला नव्हता. ते पुढे असंही म्हणाले की, मी माझ्या हयात नसलेल्या आईची शपथ घेऊन सांगितलं की माझ्यावर करण्यात आलेले हे सर्व आरोप खोटे आहेत. या विधानावरून चौफेर टीका सुरू झाल्यानंतर आझम खान यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. ते म्हणाले की, जर मी दोषी आढळलो तर लोकसभा निवडणूक लढवणार नाही. पत्रकारांवरही भडकले खान जयाप्रदा यांच्याविरोधात वाईट भाषा वापरल्याप्रकरणी निवडणूक आयोगाने त्यांच्यावर प्रचारबंदी घातली आहे. या विषयी खान यांची प्रतिक्रिया विचारायला पत्रकार सरसावले असताना आझम खान यांनी पुन्हा एकदा वाईट भाषा वापरत पत्रकारांना वाईट वागणूक दिली. आझम खान पत्रकारांशी वाईट शब्दात बोलतानाचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. काही पत्रकार खान यांना प्रचारबंदीच्या कारवाईविषयी विचारत असताना त्यांनी पत्रकारांची वाईट शब्दांत बोळवण केली. 'आपके वालिद के मौद मे आया हूँ' असं त्यांनी एका पत्रकाराला सुनावलं.
  First published: