आणखी दोन प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना क्लिन चीट

आणखी दोन प्रकरणांमध्ये निवडणूक आयोगाची नरेंद्र मोदींना क्लिन चीट

सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्धच्या तक्रारी 6 मे पूर्वी निकाली काढण्याचे आदेश दिले होते.

  • Share this:

नवी दिल्ली 03 मे : आचारसंहीता भंगाच्या आणखी दोन तक्रारींमध्ये निवडणूक आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना क्लिन चीट दिली आहे. या आधीही पंतप्रधानांना आयोगाने क्लिन चीट दिली होती. आयोगाच्या या निर्णयामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलासा मिळालाय.

नांदेडमध्ये 6 एप्रीलला दिलेल्या भाषणाविरुद्ध काँग्रेसने तक्रार दाखल केली होती. काँग्रेसने AFSPA हा कायदा हटविण्याचं आश्वासन देऊन सैनिकांना कमकूवत केलं असा आरोप पंतप्रधानांनी केला होता. महाराष्ट्र निवडणूक आयोगाने दिलेल्या अहवालानंतर आणि पंतप्रधानांचं पूर्ण भाषण अभ्यासल्यानंतर त्यांच्या भाषणामुळे आचारसंहीता भंग झाला नसल्याचं आढळून आलं असं आयोगाने म्हटलं आहे.

तर पंतप्रधानांनी एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीमुळे आचारसंहीता भंग झाल्याची तक्रार काँग्रेसचे प्रवक्ते रणदीपसिंग सुरजेवाला यांनी केली होती. त्यावरही आयोगाने पंतप्रधानांना क्लिन चीट दिली आहे.

कालच सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरुद्धच्या तक्रारी 6 मे पूर्वी निकाली काढण्याचे आदेश दिले होते.

प्रकरणे लवकर निकाली काढा

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याविरूद्धच्या आचारसंहिता भंगाच्या तक्रारी 6 मे पूर्वी निकाली काढा असे निर्देश सुप्रीम कोर्टाने गुरुवारी निवडणूक आयोगाला दिले. मोदी आणि शहांविरुद्ध विविध 9 तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. मात्र अनेक दिवसांनंतरही आयोग निकाल देत नसल्याने काँग्रेसने अखेर सुप्रीम कोर्टात धाव घेतली होती.

काँग्रेसने दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात  सुनावणी झाली. मतदानाचे आता फक्त तीन टप्पे शिल्लक आहेत. 19 मे रोजी चवथ्या टप्प्याचं मतदान होत आहे. तर चार टप्प्यांचं मतदान पूर्ण झालंय. त्यामुळे लवकरात लवकर तक्रारीवर निकाल लागला पाहिजे अशी मागणी काँग्रेसने केली होती.

सर्जिकल स्ट्राईक, भारताचे हवाई हल्ले, शहीद जवान, पंतप्रधानांचं तृणमूलचे 40 आमदार संपर्कात असल्याचं वक्तव्य अशा अनेक वक्तव्यांवरून या तक्रारी आल्या आहेत. तर दोन तक्रारींमध्ये आयोगाने पंतप्रधान नरेंद्र मोदींना क्लिन चीट दिली आहे. तर काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांना त्यांच्या एका वक्तव्याबद्दल आयोगाने नोटीस दिलीय.

या आधी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, सपाचे नेते आझम खान, साध्वी प्रज्ञा यांच्याविरुद्ध आयोगाने आचारसंहिता भंगाची कारवाई केली होती. आयोग भेदभाव करत असल्याचा आरोपही काँग्रेसने केला आहे.

First published: May 3, 2019, 10:44 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading