निवडणूक आयोगाचा ममता बॅनर्जींना झटका

ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगानं मोठा धक्का दिला आहे.

News18 Lokmat | Updated On: Apr 6, 2019 10:48 AM IST

निवडणूक आयोगाचा ममता बॅनर्जींना झटका

कोलकाता, 06 एप्रिल : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमुल काँग्रेसच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी यांना निवडणूक आयोगानं मोठा धक्का दिला आहे. निवडणूक आयोगानं शुक्रवारी रात्री कोलकाता पोलिस कमिशनर अनुज शर्मा आणि बिधानगर पोलिस कमिशनर ज्ञानवंत सिंह यांची बदली केली आहे. या अधिकाऱ्यांविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. दरम्यान, निवडणूक आयोगानं केलेली कारवाई म्हणजे ममता बॅनर्जींना मोठा धक्का मानला जात आहे. बदली करण्यात आलेले तिन्ही अधिकारी हे ममता बॅनर्जींच्या जवळचे म्हणून ओळखले जातात.


आणखी तीन अधिकाऱ्यांच्या बदल्या

अजुन शर्मा यांच्याशिवाय अजून तीन अधिकाऱ्यांवर देखील कारवाई करण्यात आली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे बदली करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांवर निवडणुकीची कोणतीही जबाबदारी देण्यात येऊ नये असे आदेश देखील निवडणूक आयोगानं दिले आहेत. दरम्यान, आदेशाची अंमलबजावणी ही तात्काळ करण्यात यावी असे देखील या आदेशात निवडणूक आयोगानं म्हटलं आहे. यावर कोणतीही प्रतिक्रिया ही अद्याप ममता बॅनर्जी यांनी दिलेली नाही.


Loading...

VIDEO: दादरच्या शोभायात्रेत आर्चिची मराठमोळी एन्ट्री; चाहतेही सैराट

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 6, 2019 10:48 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...